पुणे

'देशाचे प्रश्‍न समोर ठेवून  स्टार्ट अप सुरू केले पाहिजे'

सकाळवृत्तसेवा

पुणे - ""महाराष्ट्राची स्टार्टअप पॉलिसी इतर राज्यांच्या तुलनेत खूप प्रगत आहे. आम्ही स्थानिक पातळीवर प्रचंड संशोधन करून इथल्या सगळ्या गरजा आणि संधी लक्षात घेऊन स्टार्टअप पॉलिसी आखली आहे. केवळ उद्योग हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर न ठेवता देशाचे प्रश्न डोळ्यांसमोर ठेवून स्टार्टअप सुरू केले पाहिजे,'' असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी रविवारी येथे व्यक्त केले. 

भारत विकास ग्रुप आणि केंद्र सरकार अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे स्थापन झालेल्या सातारा मेगा फूड पार्कतर्फे आयोजित "अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी', या विषयीच्या एकदिवसीय स्टार्टअप कार्यशाळेचे उद्‌घाटन डॉ. माशेलकर यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेंद्रिय शेती आणि अन्न प्रक्रिया उद्योगातील मोरारका फौंडेशनचे संचालक डॉ. मुकेश गुप्ता आणि महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे सिझो व्हर्गी, भारत विकास ग्रुपचे संस्थापक-संचालक हणुमंत गायकवाड, सातारा मेगा फूड पार्कचे व्हाइस प्रेसिडेंट विजयकुमार चोले आदी उपस्थित होते. 

डॉ. माशेलकर म्हणाले, ""स्टार्टअपमध्ये काम करताना प्रचंड वेग आणि दिशा असणे आवश्‍यक आहे. स्टार्टअपच्या वेगाला दिशा मिळाली तर ते यशस्वी होण्यास हातभार लागतो. तसेच त्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची आवश्‍यकता आहे. सर्वसमावेशकतेने आणि सगळ्यांचा साकल्याने विचार करून देशाचे प्रश्न डोळ्यांसमोर ठेवून त्यातून स्टार्टअपच्या संधी शोधल्या पाहिजेत.'' 

प्रास्ताविक गायकवाड यांनी केले. या कार्यशाळेत शासनाच्या स्टार्टअप धोरणाविषयी माहिती देऊन अन्न प्रक्रिया व्यवसायातील शंभरपेक्षा जास्त संकल्पना मांडण्यात आल्या. तसेच या वेळी बी. व्ही. जी. आणि सातारा मेगा फूड पार्कच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवसाय संकल्पना, बॅंकेचे कर्ज, यंत्रसामग्री, प्रॉडक्‍ट डेव्हलपमेंट, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चोले यांनी केले. 

रोजगार हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. रोजगारामुळे सर्वसामान्यांची प्रगती होते, हे वास्तव औद्योगिक क्रांतीपासून आपण पाहत आलेलो आहोत. रोजगाराची उपलब्धता हा प्रगत राष्ट्रांचा पाया आहे. 
- डॉ. मुकेश गुप्ता, मोरारका फौंडेशनचे संचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT