पुणे

स्टार्टअप क्रांतीमुळे उद्योजकतेचे लोकशाहीकरण पंतप्रधान मोदी; ‘स्टार्टअप इंडिया’च्या दशकपूर्ती सोहळ्यात प्रतिपादन

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १६ : भारतातील स्टार्टअप क्रांतीने मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील तरुणांना उद्योग उभारण्यास सक्षम करून उद्योजकतेचे लोकशाहीकरण केले आहे आणि आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था बनला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील स्टार्टअप क्षेत्राची यशोगाथा मांडली.
देशातील ‘स्टार्टअप इंडिया’च्या दशकपूर्तीनिमित्त भारत मंडपम येथे झालेल्या सोहळ्याच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. वाणिज्यमंत्री पीयूष गोयल हे यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी, मोदींनी सांगितले की कृषी, ‘फिनटेक’, गतिशीलता, आरोग्य आणि शाश्वतता यांसारख्या स्टार्टअपकडून येणाऱ्या कल्पनांमुळे खऱ्या समस्या सोडविल्या जात आहेत. स्टार्टअप संस्थापक आणि नवोन्मेषकांच्या या गटाकडे पाहताना नवीन आणि विकसित भारताचे भविष्य दिसते. भारतातील तरुण आज खऱ्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.
मोदी म्हणाले ,‘‘स्टार्टअप इंडियाचा १० वर्षांचा प्रवास हा केवळ सरकारी योजनेचे यश नाही तर हजारो आणि लाखो स्वप्नांची कहाणी आहे. भारत स्टार्टअप निधीसाठी जगातील तिसऱ्या क्रमांकाची तर महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपच्या निधीसाठी दुसऱ्या क्रमांकाची परिसंस्था म्हणून उदयास आला आहे. या परिवर्तनात महिलांनी मोठी भूमिका बजावली आहे. ४५ टक्क्यांपेक्षा जास्त मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये किमान एक महिला संचालक किंवा भागीदार आहे. आधी फक्त श्रीमंत कुटुंबांतील मुलेच नवीन व्यवसाय किंवा उपक्रम सुरू करत असत, कारण त्यांनाच निधी सहज उपलब्ध होत असे. मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुतेक मुले फक्त नोकरी मिळण्याचे स्वप्न पाहू शकत होती. परंतु स्टार्टअप इंडिया कार्यक्रमाने ही मानसिकता बदलली आहे. गेल्या दशकात भारतातील स्टार्टअप इकोसिस्टमचा झपाट्याने विस्तार झाला आहे.’’

सहभाग वाढला
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘स्टार्टअप इंडियाने एक क्रांती घडविली असून भारत आता जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप परिसस्ंथा बनला आहे. देशातील स्टार्टअपची संख्या आता दोन लाखांपेक्षा जास्त झाली आहे. दहा वर्षांपूर्वी स्टार्टअप इंडिया उपक्रमात सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या केवळ ५०० ते ७०० इतकी होती. स्टार्टअप संस्थापक आणि संशोधकांच्या समूहात मला नव्या भारताचा उदय दिसत आहे.’’

‘युनिकार्न’ कंपन्यांमध्ये वाढ
बंगळूर, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली-एनसीआर सारख्या प्रमुख केंद्रांनी देशाच्या वाढीचे नेतृत्व केले आहे. आता मात्र अर्धे स्टार्टअप द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणीतील शहरांमधून उदयास येत आहेत, असे मोदींनी यावेळी सांगितले. ते म्हणाले,‘‘२०१४ मध्ये फक्त चार युनिकॉर्न कंपन्या होत्या, आता त्यांची संख्या १२० पेक्षा जास्त झाली आहे. त्यांचे एकत्रित मूल्यांकन ३५० अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. युनिकॉर्न कंपन्या आपले ‘आयपीओ’ आणत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीही करत आहेत. २०२५ मध्ये सुमारे ४४ हजार नवीन स्टार्टअपची नोंदणी झाली आहे. हे आकडे आपल्या स्टार्टअप इकोसिस्टीममधील नवोन्मेष आणि वाढीला चालना देण्यात स्टार्टअप कशी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, याचे साक्षीदार आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : महाराष्ट्राच्या राजकारणात एमआयएमची जोरदार मुसंडी विजया जागांचं ठोकलं शतक

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

End of the World : जगातलं शेवटचं शहर माहितीये का? जिथे पृथ्वीच संपते..लाखो लोकांना नाही माहिती

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

BMC Mayor: मुंबईचा नवा महापौर कोण होणार? भाजपच्या 'या' पाच उमेदवारांच्या जोरदार चर्चा; कुणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT