pune  sakal
पुणे

कर्जे, ठेवींच्या वृद्धीत महाबँक अग्रस्थानावर

देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ८.८२ टक्के वाढ नोंदवली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रने (Bank of Maharashtra)२०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीत एकूण कर्जांमध्ये (loans) १,१०,५९२ कोटी रुपयांपर्यंत म्हणजे १४.४६ टक्के (Percent) वृद्धी नोंदवली. त्यानंतरच्या क्रमांकावर असलेल्या पंजाब (Punjab) आणि सिंध (Sindh) बँकेची एकूण कर्जे ६७,९३३ कोटी रुपयांपर्यंत म्हणजे १०.१३ टक्के इतकी वाढली.

ठेवी गोळा करण्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रची १४ टक्के वृद्धी पंजाब आणि सिंध बँकेपेक्षा थोडी कमी होती, तर देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ८.८२ टक्के वाढ नोंदवली. परंतु, प्रत्यक्ष आकडेवारीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एकूण ठेवी बँक ऑफ महाराष्ट्राच्या १.७४ लक्ष कोटी रुपयांच्या तुलनेत सुमारे २१ पट जास्त होत्या. (३७.२० लक्ष कोटी रुपये). चालू खाती व बचत खाती (CASA) यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रने २२ टक्के वाढ नोंदवली, जी या तिमाहीत सार्वजनिक बँकांमध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे बँकेच्या एकूण दायित्वामध्ये त्यांचे प्रमाण ५३ टक्के (९२,४९१ कोटी रु.) आहे. जून २०२१ च्या अखेरीस बँकेचा एकूण व्यवसाय १४.१७ टक्के वाढून २.८५ लक्ष कोटीपर्यंत गेला.

पहिल्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा २०८ कोटी म्हणजे गेल्यावर्षीच्या याच कालखंडाच्या १०१ कोटीच्या दुपटीपेक्षा जास्त झाला. बँकेच्या कर्जांची गुणवत्ता पुष्कळ सुधारली. एकूण थकीत कर्जांचे प्रमाण जून २०२१ अखेरीस एकूण कर्जांच्या ६.३५ टक्के होते. गत आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या अखेरीस हे प्रमाण १०.९३ टक्के होते. प्रत्यक्ष आकड्यांमध्ये एकूण थकीत कर्जे जून २०२१ अखेरीस ७,०२२ कोटी रुपये इतकी होती. गतवर्षीच्या याच कालखंडामध्ये १०,५५८.५३ रु. इतकी नोंदवली गेली. निव्वळ थकीत कर्जे २.२२ टक्के (२,३५२.७५ कोटी रु.) इतकी म्हणजेच गतवर्षीच्या ४.१० टक्केच्या (३,६७७.३९ कोटी रु.) जवळपास अर्धी झाली.

https://www.esakal.com/mumbai/state-bank-of-india-the-countrys-largest-grew-by-882-per-cent

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यप्रदेशातून बंदुका आणून ५० हजारांत विकणारा सांगलीचा तरूण जेरबंद! मध्यप्रदेशसह माढा, पंढरपूर, सांगोला, आटणी तालुक्यातील ८ जण अटक, १७ गावठी बंदुका जप्त, वाचा...

Beed Municipal Council : बीड नगरपालिकेत ‘आपसातच’ जुंपली; ठरावातील फेरबदलावरून उपनगराध्यक्ष अन् सभापती भिडले

Banana Halwa Recipe: उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात? मग केळं, गूळ अन् ३ पिठांपासून बनवा भन्नाट ‘केळ्याचा हलवा’

आई-वडिलांच्या घरात राहून त्यांचाच छळ करता? मुलगा-सुनेला घराबाहेर काढण्याचा अधिकार पालकांना; सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

कृषी विभागाचा मोठा निर्णय! आता गावागावांत १५०० रुपये मानधनावरील शेतकरी मित्र; ३० टक्के पदे महिलांसाठी राखीव; राज्यात ११,५८७ शेतकरी मित्र नेमले जाणार

SCROLL FOR NEXT