SSC_HSC_Students 
पुणे

दहावी-बारावीच्या सवलतीच्या गुणांच्या प्रस्तावाबाबत बोर्डाने केली महत्त्वाची घोषणा; वाचा सविस्तर!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील खेळाडू, एन.सी.सी. स्काऊट गाईडमधील विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या वाढीव गुणांसाठीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे.

संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्यांना खेळाडू विद्यार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव आता 20 जूनपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे सादर करता येणार आहेत. ही मुदतवाढ अंतिम असून निकाल वेळेवर लावण्याच्या दृष्टीने यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, अशा स्पष्ट सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत.

कोरोनामुळे उद्‌भवलेली परिस्थिती लक्षात घेता खेळाडूंचे गुण प्रस्ताव तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईडमधील विद्यार्थ्यांचे सवलतीचे प्रस्ताव संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांना सादर करण्यासाठी मंडळाने यापूर्वीच 20 मेपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र अनेक विद्यार्थ्यांचे प्रस्ताव दिलेल्या मुदतीत सादर होऊ शकलेले नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि खेळाडू संघटनांनी मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंती केली होती. त्याप्रमाणे ही मुदतवाढ दिली आहे.

संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना आता खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव 20 जूनपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे सादर करता येणार आहेत. तर संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आलेल्या प्रस्तावांची छाननी करून ते 25 जूनपर्यंत संबंधित विभागीय मंडळ कार्यालयास शिफारशींसह सादर करावेत.

तसेच एन.सी.सी. आणि स्काऊट गाईड प्रस्तावाबाबतही या वाढीव मुदतीप्रमाणे कार्यवाही करावी. हा शासन निर्णय केवळ 2019-20 या एका शैक्षणिक वर्षाकरिता लागू आहे. तसेच ही अंतिम मुदतवाढ असणार आहे. त्यामुळे कोणताही पात्र विद्यार्थी या गुणांच्या सवलतीपासून वंचित राहणार नाही, याची सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी नमूद केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT