पुणे

नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

CD

पुणे, ता. २४ ः राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धांना १६ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धांमधील नाटकांचे परीक्षण करण्यासाठी नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत, बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य या विभागातील स्पर्धा, तसेच मराठी एकांकिका आणि मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा अशा विविध राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांचे दरवर्षी आयोजन केले जाते. या स्पर्धांच्या परीक्षण प्रक्रियेत नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांचा अधिकाधिक सहभाग व्हावा आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ स्पर्धेतील कलाकार व नाट्यसंस्थांना मिळावा, या उद्देशाने यंदा परीक्षणासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पष्ट केले.
यंदाच्या स्पर्धेतील नाटकांचे परीक्षण करण्यासाठी नाट्य क्षेत्रातील कलाकारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे असून, रविवारपर्यंत (ता. २५) हे अर्ज सादर करता येणार आहेत. ऑनलाइन अर्ज तसेच यासंदर्भातील अधिक माहितीसाठी mahanatyaspardha.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. पात्र व अनुभवी नाट्य कलाकारांनी या संधीचा लाभ घेऊन विहित मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Career Growth: ज्याला तीन लाख वार्षिक पगाराच्या कामावरून कंपनीने काढलं, त्याच तरुणाला आली दुबईतील १.५ कोटींच्या नोकरीची ऑफर

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

पुढच्या सात दिवसांत ४ राशींचं नशीब चमकणार! धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे योग

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

CBI Arrests ED officers : दुसऱ्यांवर धाडी टाकणाऱ्या ED अधिकाऱ्यांवरच CBI ची झडप! केसमधून वाचवण्यासाठी केला होता 'हा' मोठा सौदा

SCROLL FOR NEXT