State Excise Departmen sakal
पुणे

पुणे : नव वर्षाच्या पूर्व संधेला राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

बनावट देशी, विदेशी दारूचा साठा जप्त

रवींद्र पाटे

नारायणगाव : नव वर्षाच्या पूर्व संधेला येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने आंबेगाव व हवेली तालुक्यात धडाकेबाज कारवाई करून बनावट देशी, विदेशी दारूचा साठा, बनावट मद्य तयार करण्यासाठी आवश्यक असलेले स्पिरीट, रिकाम्या बाटल्या, बाटल्या सील करण्याचे यंत्र, टेम्पो असा ९ लाख १४ हजार ४३२ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन तरुणांना अटक केली असून आरोपींना जुन्नर न्यायालयाने ३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.आशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक ए. बी.पवार यांनी दिली.या प्रकरणी सागर तुकाराम कतोरे, मयूर बाळासाहेब कतोरे(दोघेही राहणार चिंबळी, ता.खेड) यांना अटक करण्यात आली आहे.(Stocks of counterfeit domestic, foreign liquor)

या बाबत पोलीस निरीक्षक पवार म्हणाले कळंब ( ता. आंबेगाव) येथे बनावट दारू घेऊन वाहन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या नुसार सापळा रचून ३० डिसेंबर २०२१ रोजी कळंब येथील हॉटेल पंचमीच्या मागील बाजूस उभ्या असलेल्या टेम्पोची तपासणी केली असता बनावट देशी, विदेशी दारूच्या बाटल्या असलेले चौदा बॉक्स आढळून आले.या प्रकरणी सागर कतोरे व मयूर कतोरे यांना अटक करून टेम्पोसह मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपींकडे सखोल चौकशी केली असता काळेवाडी (ता.हवेली)येथील गोडाऊन मध्ये बनावट मद्य तयार केले जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे काळेवाडी येथील गोडाऊन मध्ये छापा टाकून बनावट मद्य तयार करण्यासाठी आवश्यक असलेले स्पिरीट, रिकाम्या बाटल्या, बाटल्या सील करण्याचे यंत्र, बुच आदी मुद्देमाल जप्त केला. नवीन वर्षाच्या पूर्व संधेला दोन्ही ठिकाणी कारवाई करून ९ लाख १४ हजार ४३२ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT