The state government has decided to exclude housing societies from elections but its rules have not yet been finalized 
पुणे

काळजीवाहू कारभाऱ्यांमुळे सोसायट्यांची अडचण

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील अडीचशेपेक्षा कमी सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना निवडणुकांमधून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा; परंतु त्याची नियमावली अद्यापही तयार झालेली नाही. नियमावली तयार करण्यासाठी राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण आणि सहकार आयुक्त यांच्यामध्ये टोलवाटोलवी केली जात आहे, त्यामुळे पुणे शहरासह राज्यातील ऐंशी हजारांहून अधिक सोसायट्यांमध्ये सध्या ‘काळजीवाहू समित्या’ काम करीत असल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

राज्य सरकारकडून २०१४ मध्ये ९७ वी घटना दुरुस्ती करण्यात आली. राज्यातील सर्व सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका या सहकार निवडणूक प्राधिकरणामार्फत घेण्याचे बंधन घालण्यात आले. त्यासाठीच्या नियमावलीमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांचादेखील समावेश करण्यात आला. पुणे शहरामध्ये सुमारे १८ हजार, तर राज्यात एक लाख गृहनिर्माण संस्था आहेत. या सर्व गृहनिर्माण संस्थांची जबाबदारी निवडणूक प्राधिकरणाकडे येऊन पडली. त्यातून अनेक प्रश्‍न निर्माण झाले. अडीचशेपेक्षा कमी सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना यातून वगळावे, यासाठी प्राधिकरण आणि महाराष्ट्र हाउसिंग फेडरेशन गेली अनेक वर्षे राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत होते.

दरम्यान महिन्याभरापूर्वी अशा गृहनिर्माण सोसायट्यांना यातून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, त्यामुळे सोसायटीधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला; परंतु त्याची अंमलबजावणी करण्याकरिता अद्याप राज्य सरकारकडून नियमावली करण्यात आलेली नाही. ही नियमावली करावी यासाठी हाउसिंग फेडरेशनच्या वतीने पाठपुरावा केला जात आहे, त्यावर निर्णय घेण्याऐवजी महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरणाला पत्र पाठवून याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे कळवत चेंडू जिल्हा सहकार निवडणूक प्रधिकरणाच्या कोर्टात ढकलला आहे. नियमावलीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आणि या गृहनिर्माण सोसायट्या वगळण्यासाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन केली आहे. त्या समितीची अद्याप एकही बैठक झालेली नाही. 

 नियमावलीमध्ये बदल करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचा मी सदस्य आहे. अद्याप या समितीची एकही बैठक झालेली नाही, त्यामुळे सोसायट्यांचा कारभार सुरळीत होण्याऐवजी त्यामध्ये अडचणी वाढल्या आहेत.
- सुहास पटवर्धन, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Deputy Chief Minister Ajit Pawar: राहुल गांधींच्या आरोपात तथ्य नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार; 'हरल्यावरच ईव्हीएमची आठवण येते, जिंकल्यावर नाही'

Latest Marathi News Updates : पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राखचा खून करून संशयितांचे मिरजेकडे पलायन

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Asia Cup 2025 : अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरू असतानाच वडिलांचं निधन, श्रीलंकेच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT