educaiton 
पुणे

#Education बोगस आदिवासींच्या घुसखोरीला चाप 

उमेश घोंगडे

पुणे - आदिवासी असल्याचे जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जात पडताळणी समितीकडे अर्ज करून व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविणाऱ्या बोगस आदिवासींचे प्रवेश रोखण्यासाठी राज्य सरकारने विशेष काळजी घेतली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश घेतानाच प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व सध्या अकरावीत किंवा बारावीत असलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे अर्ज करण्याची मुदत 30 डिसेंबरपर्यंत आहे. 

विद्यार्थ्यांना शिकत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करता येतील. ऑनलाइन अर्जाची "हार्ड कॉपी' संबंधित कनिष्ठ महाविद्यालयामार्फत कागदपत्रांसह जात पडताळणी समितीकडे पाठविण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना या समितीच्या माध्यमातून मिळणारे जात वैधता प्रमाणपत्र व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनुसूचित जमातीमधील राखीव जागांसाठी आवश्‍यक आहे. राखीव जागांच्या कोट्यातून प्रवेश हवा असल्यास प्रवेश अर्ज करताना जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्‍यक व सक्तीचे करण्यात आले आहे. आदिवासी समाजाशी साधर्म्य असलेल्या अनेक जातीतील विद्यार्थी आदिवासी कोट्यातून अर्ज करतात. समितीकडे अर्ज केल्याचे सांगतात. जात वैधता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सादर करणार असल्याचे सांगतात. प्रत्यक्ष प्रमाणपत्र मिळत नाही. या साऱ्या पाठपुराव्यात जवळपास वर्ष पूर्ण झालेले असते. त्यामुळे न्यायालयात धाव घेऊन नैसर्गिक न्यायाच्या आधारे जात वैधता प्रमाणपत्राशिवाय अभ्यासक्रमाचा प्रवेश न्यायालयाकडून कायम करून घेतात. कायदेशीर आधार घेत आदिवासींच्या जागांवर प्रवेश घेण्याचे अनेक प्रकार गेल्या काही वर्षांत घडले आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी अर्ज करताना जात वैधता प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. त्यासाठी समितीकडे विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करणे आवश्‍यक आहे. या वर्षी अर्ज करण्याची मुदत 30 डिसेंबर असली, तरी 2021-22 च्या शैक्षणिक वर्षापासून ही मुदत 30 नोव्हेंबर राहणार आहे. या प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी etribevalidity.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर संपर्क करता येईल. 

आदिवासींच्या जागांवर बिगरआदिवासींची घुसखोरी रोखण्यासाठी अशा प्रकारची उपाययोजना आवश्‍यक होती. राज्य सरकारने या भूमिकेवर कायम राहावे. यातून खऱ्या आदिवासींना न्याय मिळण्यास मदत होणार आहे. 
- डॉ. संजय दाभाडे,  निमंत्रक, आदिवासी विकास मंच 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT