state govt launch film policy film city avinash dhakane pune Sakal
पुणे

चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच येणार राज्य सरकारचे चित्रपट धोरण - अविनाश ढाकणे

"देशात अनेक चित्रपट महोत्सव होतात, मात्र पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारखा चित्रपट महोत्सव एकमेव आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : "देशात अनेक चित्रपट महोत्सव होतात, मात्र पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारखा चित्रपट महोत्सव एकमेव आहे. असे महोत्सव तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. राज्य सरकार चांगल्या पद्धतीचे चित्रपट धोरण तयार करत असून त्याद्वारे चित्रपट क्षेत्राला प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल.''

अशी माहिती "फिल्म सिटी'चे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे यांनी दिली. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन ढाकणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ढाकणे म्हणाले, " पुणे केवळ सांस्कृतिक राजधानीच नव्हे, तर शैक्षणिक व आयटी हब देखील आहे.

डॉ.जब्बार पटेल यांनी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चांगल्या पद्धतीने पुढे आणला आहे. या महोत्सवात 51 देशांमधून आठशेहून अधिक चित्रपट रसिकांना पाहण्यास मिळणार आहेत. स्थानिक कथांवर आधारित असलेले चित्रपट कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. चित्रपट क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. त्यानुसार चित्रपट धोरण ही तयार करत आहे. हे धोरण लवकरच मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर केले जाणार आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : दुकाने फोडणारा परराज्यातील सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT