Governor Bhagat Singh Koshari sakal
पुणे

ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान; विविध क्षेत्रांतील व्यक्तींचाही गौरव

सकाळ वृत्तसेवा

न्हावरे : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत नेहरू युवा केंद्र संगठण महाराष्ट्र व गोवा यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय युवा उत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार न्हावरे (ता. शिरूर) येथील ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.

युवा शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबन कार्यासाठी उत्कृष्ट संस्था म्हणून देण्यात आलेला हा पुरस्कार मुंबईत राजभवनात झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष गीताराम कदम यांनी स्वीकारला. एक लाख रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी नेहरू युवा केंद्राचे संचालक प्रकाश कुमार मनुरे, उपसंचालक यशवंत मानखेडकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी समाजोपयोगी व विधायक पत्रकारितेबद्दल ‘सकाळ’चे बातमीदार व मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, तसेच ‘ॲग्रोवन’चे बातमीदार संदीप नवले यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स रिसर्च पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळिग्राम, सी. टी. बोरा कॉलेजचे प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते, तसेच सागर हेमाडे, रसिका कुलकर्णी, सुज्ञान मानखेडकर, राज सुनील रणधीर, विकास कात्रे यांनाही विविध क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कोश्यारी यांनी नेहरू युवा केंद्र, तसेच ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेसह विविध पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘युवकांमध्ये देशाभिमान, विधायक, सामाजिक कार्याबद्दल जागृती, तसेच सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती गावांपर्यंत पोहोचविण्यासाठी नेहरू युवा केंद्र, संस्था व व्यक्ती चांगले कार्य करीत आहेत. आदिवासी भागांच्या उन्नतीसाठीही कार्य होणे आवश्यक आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT