PNE26W40981 -
फोटोओळ :
सोलापूर : राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थी.
२०१ विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय
बालचित्रकला स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग
निर्मलाताई ठोकळ प्रशालेत स्पर्धेचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १० : श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेत २०१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची आवड निर्माण करणे, त्यांच्या सृजनशीलतेला चालना देणे तसेच कल्पनाशक्तीला वाव देणे, हा स्पर्धेचा उद्देश होता. इयत्ता पाचवी ते सातवीच्या गट क्रमांक ३ आणि इयत्ता आठवी ते दहावीच्या गट क्रमांक ४ मधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने नोंदणी केली.
या स्पर्धेच्या दिवशीच मंडळाकडून विद्यार्थ्यांना चित्रकलेचे विषय देण्यात आले. गट क्रमांक ३ साठी ‘गावातील आठवडी बाजार’, ‘किल्ला बनवणारी मुले’ आणि ‘बस स्थानकावरील प्रसंग’, तर गट क्रमांक ४ साठी ‘वर्ग सजावट’, ‘फुटबॉल खेळणारी मुले’ आणि ‘विद्यार्थ्यांना प्रयोग दाखवणारे शिक्षक’ हे विषय देण्यात आले. विद्यार्थी नोंदणी, मार्गदर्शन तसेच केंद्रसमन्वयक म्हणून सहशिक्षक रमणशेट्टी एन. सी. यांनी जबाबदारी पार पाडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.