Dattatray Bharne Sakal
पुणे

इंदापूरचा पाण्याचा विषय थांबला असला तरीही मी थांबलाे नाही...

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीचे व पिण्याचे पाणी कायमस्वरुपी देण्याची भरणे यांची ग्वाही

राजकुमार थाेरात

वालचंदनगर : उजनीच्या पाण्यासंदर्भात इंदापूरच्या काही लोकांनी सोलापूरकरांचा गैरसमज केला. आपल्याच तालुक्यातून काही कागदपत्रे सोलापूरमध्ये गेली. सध्या इंदापूरच्या पाण्याचा विषय थांबला असला तरीही मी इंदापूरच्या शेतीच्या पाण्यासाठी थांबलाे नाही. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीचे व पिण्याचे कायमस्वरुपी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharne) यांनी दिली.

निरवांगी (ता.इंदापूर) येथे ३० कोटी ८० लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमीपुजन व उद्घघाटनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजी पानसरे,युवकचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ,छत्रपतीचे संचालक अभिजित रणवरे,अॅड. लक्ष्मण शिंगाडे, अभिजित तांबिले, वीरसिंह रणसिंग, नंदकुमार रणवरे, प्रशांत पाटील, दादासाहेब भाळे,सागर मिसाळ उपस्थित होते.

यावेळी भरणे यांनी सांगितले की, २२ गावासह इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीच्या पाण्यासाठी त्याग केला आहे. इंदापूर तालुक्यातील काही जणांनी विनाकारण सोलापूर वाल्यांचा गैरसमज केला. उजनीचे पाणी इंदापूराला पाणी मिळाले तर आपल्या राजकारणाचे काय होईल अशी त्यांना भिती वाटली असावी. गैरसमज करणाऱ्यांची शेती पिकली नाही तर त्यांना काहीही फरक पडणार नाही.

मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांची शेतीला पाणी मिळाले नाही तर त्यांची पिके जळून जाणार असून शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी मी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. यावेळी निरवांगीचे माजी सरपंच अजिनाथ कांबळे, हनुमंतराव पोळ, विठ्ठल पवार,रणजित रासकर यांनी मनोगत व्यक्त करुन गावच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केली.

नीरा नदीकाठीच्या जमिनीला येणार सोन्याचा भाव... शेतकऱ्यांनी जमीन न विकण्याचे भरणे यांचे आवाहन...

येणाऱ्या काही दिवसामध्ये बीकेबीएन रस्त्याचे काम पूर्ण होणार आहेत. तसेच नीरा नदीवरती खोरोची ,बाेराटवाडी, व नीर-निमगाव येथे पुल होणार असून प्रवाशांची वाहतुक वाढणार आहे.नीरा नदी काठच्या गावांचा विकास होणार असून शेतकऱ्यांच्या जमिनीला सोन्याचा भाव येणार असून शेतकऱ्यांनी जमिनी न विकण्याचे आवाहन राज्यमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांना केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT