Pune News sakal
पुणे

Pune News : येरवड्यात अत्याधुनिक डिजिटल साक्षरता लॅब सुरू

विद्या संस्था आणि बॉश ग्लोबल सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीतर्फे येरवडा येथील सरकारी बाल सुधारगृह येथे उभारलेल्या अत्याधुनिक डिजिटल साक्षरता लॅबचे उद्‍घाटन टेक्नॉलॉजीचे पुणे केंद्रप्रमुख आदित्य अडवी यांच्या हस्ते झाले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विद्या संस्था आणि बॉश ग्लोबल सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीतर्फे येरवडा येथील सरकारी बाल सुधारगृह येथे उभारलेल्या अत्याधुनिक डिजिटल साक्षरता लॅबचे उद्‍घाटन टेक्नॉलॉजीचे पुणे केंद्रप्रमुख आदित्य अडवी यांच्या हस्ते झाले. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला.

या वेळी टेक्नॉलॉजीचे प्रमुख पदाधिकारी रमेश पलानीप्पन, दीपक सिंग, आकांक्षा तिवारी, बेला शर्मा, मीनाक्षी रॉय, नीता प्रधान, रितिका बजाज, बाल न्याय मंडळाच्या सदस्या के. टी. थोरात, मेहाला नागराज आदी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये प्रकल्प परिचय, विद्यार्थी स्किट्स, डिजिटल कौशल्ये प्रात्यक्षिके झाली. विद्या वेस्ट झोनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमुख प्रियांका माथूर यांनी मार्गदर्शन केले.

अडवी म्हणाले, ‘‘मुलांना त्यांच्याशी सुसंगत असा व्यवसाय देऊन त्यांना सक्षम बनविण्याचे हे एक मोठे पाऊल आहे. डिजिटल साक्षरतेद्वारे त्यांना येथे नकारात्मक प्रभावापासून दूर जाण्याची आणि त्यांच्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि देशासाठी सकारात्मक योगदान देण्याची संधी त्यांना मिळावी.’’

बाल सुधारगृहाचे अधीक्षक दत्तात्रय कुटे यांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्या इंडियाच्या संस्थापक-अध्यक्षा रश्मी मिश्रा व डॉ. विद्या संस्थेच्या पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष डॉ. नयन दाभोलकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT