pune.jpg 
पुणे

 कॉंग्रेस पक्षामुळे राज्याची प्रगती : हर्षवर्धन पाटील 

आदम पठाण

वडापुरी : "देशात व राज्यात झालेली प्रगती ही कॉंग्रेस पक्षामुळे झाली आहे. गेल्या चार वर्षात राज्यात व देशाच्या नागरिकांना याची जाणीव झाली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढत चालला आहे." , असे प्रतिपादन कॉंग्रेसचे नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.   

इंदापूर येथे आज (ता.21) तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित मेळाव्यात पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटी कमिटीच्या ओबीसी विभागाच्या अध्यक्षपदी विजय चोरमले यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. या वेळी पाटील बोलत होते. या कार्यक्रमात राज्यात हरियाणा (भिवडी ) येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेल्या पैलवान सागर मारकड यांचा सत्कार हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या राहुल गांधी युवा संघटनच्या तालुका तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, ''कॉंग्रेस ही एक विचारधारा आहे. कॉंग्रेसला 127 वर्षाचा इतिहास आहे. नुकत्याच कर्नाटक मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. तसेच सध्या होत असलेल्या चार राज्यातील निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष सत्तेत येईल'' असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
''इंदापूर तालुक्यात गेल्या चार वर्षात विकास कामांमध्ये मागे गेला आहे. पाण्याअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. लोणी देवकर एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग व्यवसाय येत नाहीत,त्यामुळे बेरोजगार वाढले आहे. या परिस्थितीमध्ये बदल करण्यासाठी करण्याची क्षमता कॉंग्रेस नेतृत्वातच आहे'' असे पाटील यांनी नमूद केले.

यावेळी विलासराव वाघमोडे, करणसिंह घोलप, देवराव जाधव, दीपक जाधव ,महेंद्र पाटील, हनुमंत काजळे पाटील, विजय चोरमले, सोमनाथ दौंडकर, सागर मारकड, महाराष्ट्र महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे ओबीसी सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष अमित कारंडे, आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मयुरसिंह पाटील, भरत शेठ शहा, देवराव जाधव, शिवाजी तरंगे, मंगेश पाटील, कैलास कदम, नारायण वीर, अमरसिंह पाटील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कॉँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कृष्णाजी यादव यांनी केले. सुत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी व आभार इंदापूर शहर अध्यक्ष बापू  जामदार यांनी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

World Cup 2025: 'आता विजयाची सवय लावायची...' वर्ल्ड कप विजयानंतर काय म्हणाली कॅप्टन हरमनप्रीत कौर?

SCROLL FOR NEXT