arrest.jpg 
पुणे

चाकू, कोयत्याचा धाक दाखवून कार व पैसे केले लंपास; तिघांना अटक

सकाळवृत्तसेवा

वाघोली (पुणे) : औरंगाबाद येथे जाण्यासाठी भाडेतत्वावर कार बुक केली. चालक कार घेऊन गेल्यानंतर बुक केलेल्यांनी चालकाला चाकू, कोयत्याचा धाक दाखवून कार व पैशांची चोरी केली व ते फरार झाले. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी कसून शोध घेत एका अल्पवयीन मुलासह तिघांना अटक केली. वाघोली येथील बकोरी फाटा येथे चोरीची घटना घडली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सागर नवनाथ पिंगळे (वय २५), भूषण शरद माळी (वय १९) आणि अल्पवयीन मुलगा (तिघेही रा. वाडा पुनर्वसन, कोरेगाव भीमा) असे जबरी चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील बकोरी फाटा येथे तिघांनी औरंगाबाद येथे जाण्यासाठी इरटीगा कार भाडेतत्वावर घेतली. चालक कार घेऊन आला. त्यानंतर ते निघाले. काही अंतर गेल्यावर त्या तिघांनी चालकाला चाकू, दोरी, कोयता गळ्याला लावला. कार एका सोसायटीच्या खाली नेऊन चालकाला जबर मारहाण करत त्याच्या जवळची रक्कम काढून घेतली आणि बँक खात्यातील दहा हजार रुपये गुगल पे मार्फत चोरट्यांनी स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर कार घेऊन ते फरार झाले.

यानंतर चालकाने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी कसून तपास करून कोरेगाव भीमा येथून तिघांना जेरबंद केले. सदरची कामगिरी पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व लोणीकंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे, उपनिरीक्षक हनुमंत पडळकर, उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, उपनिरीक्षक राम दोंडगे, बाळासाहेब सकाटे, राजू मोमीन, विजय कांचन, श्रीमंत होनमाने, दत्तात्रय काळे, संतोष मारकड, समीर पिलाणे, धीरज जाधव, सूरज वळेकर, ऋषिकेश व्यवहारे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT