पुणे

स्टील पुरवठ्याच्या बहाण्याने व्‍यावसायिकाची फसवणूक

CD

पिंपरी : स्टीलचा पुरवठादार असल्याची बतावणी करून व्‍यावसायिकाची सहा लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. ११ सप्टेंबरला पिंपळे सौदागर येथे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अतुल गोवर्धन कदम (वय ३५, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बँकेच्या खातेदारासह इतर संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांना व्हॉट्सॲपवर कॉल करून बिदर (कर्नाटक) येथील स्टील मटेरिअल पुरवठादार असल्याचे सांगितले. बनावट इनव्हॉइस आणि ‘जीएसटी’ नोंदणी प्रमाणपत्र पाठवून सहा लाख ५० हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले.

किरकोळ कारणावरून हत्याराने वार
पिंपरी : दुचाकीचालकास बोलण्‍याच्‍या रागातून तिघांनी एकाला बेदम मारहाण करून डोक्यात वार केले. चिखली येथे कृष्णानगरमध्ये शनिवारी (ता. १२) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. अभिषेक भालचंद्र नायर (वय ३२, रा. नेवाळेवस्ती, चिखली) यांनी दिलेल्‍या तक्रारीनुसार तुषार मुकेश कांबळे (वय २३, रा. अजंठानगर, निगडी) यासह अन्‍य दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे दुकान बंद करून दुचाकीवरून घरी जात असताना, समोरून मोबाईलवर बोलत दुचाकीवरून आरोपी जात होते. ‘गाडी नीट चालवा’ असे सांगितल्‍याने फिर्यादी यांना डोक्यावर वार केला.

पुनावळेत शटर उचकटून चोरी
पिंपरी : किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने रोकड, किराणा साहित्य आणि महत्त्वाची कागदपत्रे असा २० हजार १०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. पुनावळे येथे ग्रोसरी मार्ट दुकानात हा प्रकार घडला. प्रवीण प्रकाश कुंभार (वय ३५, रा. पुनावळे) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शटरचा पत्रा उचकटून नऊ हजारांची रोकड तसेच किराणा साहित्य, दुकानाचे परवाने, आधार व पॅनकार्ड असा ऐवज लंपास केला.

ज्येष्ठ महिलेला कोयत्याने धमकी
पिंपरी : घराच्‍या वादातून कोयता आणि लोखंडी टिकावाने ७० वर्षीय महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. पिंपळे गुरव येथे रविवारी (ता. १३) सकाळी ही घटना घडली. कामाची पिरियसस्वामी पिल्ले यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तर, गणेश बालकृष्ण पडाची याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. ‘हे घर सोडून निघून जा,’ असे म्हणत कोयता उगारून हात कापण्याची धमकी दिली. तसेच, घरातील सामानाचीही तोडफोड केल्‍याचे तक्रारीत नमूद केले आहे.

निगडीत ३१२ ग्रॅम गांजा जप्त
पिंपरी : बेकायदेशीररीत्या गांजा बाळगल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी रणजीत शेषराव शेंडगे (वय ५६, रा. ओटास्कीम, निगडी) याला अटक केली आहे. त्याच्याकडून ३१२ ग्रॅम १५ हजार ६०० रुपयांचा गांजा जप्त केला. ओटास्कीम निगडी येथे स्पाइन रस्त्याच्या सेवा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.

चिंचवडमध्‍ये फळगाडीला आग; एकावर गुन्‍हा
पिंपरी : फळांच्या हातगाडीला आग लावल्‍याप्रकरणी एकावर गुन्‍हा दाखल केला आहे. चिंचवड येथे चापेकर चौकात रविवारी (ता. १३) ही घटना उघडकीस आली. विकास बापू क्षीरसागर (वय ३६, रा. वेताळनगर, चिंचवड) याच्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातगाडीवर फळे, वजनकाटा, छत्री, खुर्ची आणि पाण्याचा जार आदी साहित्य बांधून ठेवले होते. या हातगाडीला आग लावून नुकसान केल्‍याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आमदार लोगोप्रकरणी तिघांवर कारवाई
पिंपरी ः दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाहनांवर आमदार लोगो लावल्याप्रकरणी तीन जणांच्‍या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
पिंपरी येथील गेलार्ड चौकात युवराज भरत बाबर (वय २८, रा. कासारवाडी) याने क्रेटा वाहनावर सवलत आणि आर्थिक फायद्यासाठी लोगो लावल्याचे आढळून आले. तसेच, भोसरी रस्‍त्‍यावर वसिम अहमद अब्दुल जलील आळंद (वय ४२, रा. हडपसर) आणि हितेंद्र अशोक कवडे (रा. घोरपडी) यांच्याविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आला. आर्थिक ‘व्हीआयपी’ सवलत मिळविण्याच्या उद्देशाने वाहनावर हा लोगो लावल्याचे दोघांनी पोलिसांना सांगितले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Interesting Money Story: कुत्र्याला फिरवायला गेले अन् नशीबच पालटलं! ना लॉटरी, ना वारसा... एका क्षणात झाले करोडपती; नेमकं काय घडलं?

अंकिता वालावलकरने गणेशोत्सवादिवशीच दिली गुडन्यूज, मुंबईत घेतलं स्वतःचं घर; कुठे आहे तिचा २ बीएचके? म्हणते- सध्या इंटेरिअर...

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

दगडूशेठ बाप्पाला हे नाव कसं मिळालं? जाणून घ्या दगडूशेठ हलवाईंची कहाणी

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

SCROLL FOR NEXT