RTO Officer sakal
पुणे

Pune RTO : अपघात रोखण्यासाठी खासगी संस्थांकडे ‘स्टिअरिंग’

पुणे आरटीओ कार्यालयात सुरू झाली ‘रस्ता सुरक्षा व अनुभव प्रयोगशाळा’

सकाळ वृत्तसेवा

पुणे - वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्याचा परिवहन विभाग आता खासगी संस्थेची मदत घेत आहे. पुणे आरटीओ कार्यालयात ‘कृझींग सेफ’ या संस्थेने प्रायोगिक स्तरावर ‘रस्ता सुरक्षा व अनुभव प्रयोगशाळा’ सुरू केली आहे. यात वाहन परवान्यासाठी ‘आरटीओ’ची चाचणी देण्याआधी उमेदवारांना तीन स्तरांवर चाचणी द्यावी लागत आहे. राज्यातील तीन आरटीओ कार्यालयांत अशी ‘अनुभव प्रयोगशाळा’ सुरू झाली असून, यात पुणे आरटीओचादेखील समावेश आहे.

गेल्या काही दिवसांत पुणे शहर व जिल्हात रस्ते अपघातांची संख्या वाढली आहे. अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांचे केवळ समुपदेशन करून चालणार नाही, तर त्यांना प्रशिक्षण देण्याचीदेखील गरज निर्माण झाली आहे. पुणे आरटीओ कार्यालयात सुरू झालेल्या ‘अनुभव प्रयोगशाळे’च्या माध्यमातून शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना तीन स्तरांवर चाचणी द्यावी लागत आहे.

पहिल्या स्तरात रस्ते वाहतुकीचे नियम मोडल्यास किती दंड होतो, याविषयी प्रश्‍न विचारले गेले आहेत, दुसऱ्यात वाहतुकीचे नियम सांगून त्यावर आधारित प्रश्‍न विचारले गेले आहेत आणि तिसऱ्या स्तरात व्हिडिओ दाखविण्यात आला आहे. उमेदवारांना चाचणी देण्यासाठी येथेच संस्थेच्या वतीने मोबाइल उपलब्ध केला असून, मोबाइलवर ऑनलाइन चाचणी द्यायची आहे.

एका वेळी सुमारे १० ते १२ उमेदवार चाचणी देऊ शकतात. तत्पूर्वी आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करतात. त्यांनतर प्रत्यक्षात चाचणीला सुरुवात केली जाते. यात २० प्रश्‍न व व्हिडिओ दाखवून मार्गदर्शन केले जात आहे. दिवसातून किमान ५० उमेदवारांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.

पुणे आरटीओ कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या या लॅबद्वारे घेण्यात येणारी चाचणी ही उमेदवारांना अनिवार्य नाही. मात्र या चाचणीमुळे वाहनधारकांना रस्तेविषयक नियमांची चांगली माहिती मिळते. यामुळे अपघात कमी होण्याची शक्यता असल्याचे संबंधित संस्थेला वाटते. उमेदवारांचादेखील याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. या चाचणीसाठी सुमारे १० ते १५ मिनिटांचा वेळ लागतो. तत्पूर्वी आरटीओच्या निरीक्षकांचेदेखील मार्गदर्शन सुरू असते. यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही.

रस्ते अपघात कमी करण्यासाठी राज्यातील तीन आरटीओ कार्यालयांत केंद्र स्थापन केले आहे. यात पुण्याचादेखील समावेश आहे. नागरिकांनी सुरक्षित रस्ते वाहतूक करावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

- गणेश ओकरे, केंद्र व्यवस्थापक, कृझींग सेफ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT