Stickers-Rangoli 
पुणे

स्टिकर्सच्या रांगोळीलाही पसंती

सकाळवृत्तसेवा

पुणे - वाडे गेले, फ्लॅट संस्कृती रुजली. मात्र पारंपरिक रांगोळी सोबतच आता रांगोळीच्या स्टिकर्सलाही विशेष पसंती गेल्या काही वर्षांपासून नागरिकांकडून मिळत आहे. दिवाळीनिमित्त बाजारात रांगोळीचे छाप, स्ट्रिकर्स, शुभ-लाभ, लक्ष्मीचे चित्र, ओम, स्वस्तिक, उंबऱ्यावरची पट्टी अशा अनेकविध वॉटरफ्रूफ वस्तू आल्या आहेत. 

शहरभर अनेक ठिकाणी हातगाडीवाल्यांनी रांगोळ्या, रंगमिश्रित रांगोळी, विविध रंगांची तसेच रांगोळ्यांच्या स्टिकर्सची दूकाने थाटली आहेत. राळेपासून तयार केलेली रांगोळी आणि रांगोळ्यांच्या स्टिकर्स असे दोन्हीही पर्याय ग्राहकांना उपलब्ध झाले आहेत. ग्राहकांच्या खिशाला परवडेल, इतक्‍या माफक दरात रांगोळी व रांगोळीची स्टिकर्स मिळत आहेत. 

गेल्या दोन-तीन वर्षांपासून रांगोळीच्या स्टिकर्सची मागणी वाढली आहे. त्यामुळे विक्रेत्यांनीही कलाकारांकडून आकर्षक नक्षीकामातील रांगोळ्यांचे छाप तयार करवून घेतले आहेत. कंपन्या, संस्थाच काय, तर घरगुती सजावटीसाठी देखील स्टिकर्स ग्राहक खरेदी करत असल्याचे विक्रेते सांगतात.

पन्नासहून अधिक प्रकारचे रांगोळ्यांचे स्टिकर्स आले आहेत. कलाकारांकडून खास संगणकीकृत नक्षीकाम करवून घेतले जाते. त्यावरून ही स्टिकर्स तयार करतात. पाण्यात भिजली तरीही खराब होत नाहीत. दिसायलाही आकर्षक दिसतात. त्यामुळे ग्राहकही रांगोळ्यांची स्टिकर्स खरेदी करतात.
- पीयूष बलदोटा, विक्रेते

रांगोळीत रंग भरायला हल्लीच्या महिलांकडे पुरेसा वेळ नाही. स्टिकर्स लावल्याने वेळ वाचतो. दिसायलाही छान दिसते. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी स्टिकर्स आहेत. त्यामुळे दिवाळी आली की देवीची पावले, रांगोळ्या, पणत्या, शुभ-दीपावली यांसारखी स्टिकर्स मी खरेदी करते.
- मालती काळभोर, गृहिणी

पारंपरिक रांगोळी राजस्थानहून येते. गेली तीस वर्षे मी रांगोळी विक्रीचा व्यवसाय करतोय. साधी रांगोळी वीस रुपये किलो, तर रंगमिश्रित रांगोळी चाळीस रुपये किलोने विक्रीस आहे. रांगोळ्यांचे स्टिकर्स आले तरीही राळेच्या रांगोळीला पूर्वीचे स्थान आजही आहे.
- रवींद्र लबडे, विक्रेते  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayali Surve Gharwapsi : प्रेमासाठी बदलला धर्म! 10 वर्षात झाली 4 मुलं, पण नवऱ्यानं..; पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी, तिच्यासोबत सासरी असं काय घडलं?

Pune News: इराणच्या बंदरांवर कंटेनर अडकले! कृषिमाल निर्यातीवर युद्धाचा मोठा परिणाम; इराणी सफरचंद, किवीच्या दरात वाढ, शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फटका..

'तुम्हाला माझ्या नवऱ्यासोबत दारु प्यायची का?' उषा नाडकर्णी स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...'तुम्हाला काय करायचं?'

Latest Marathi News Live Update : भोकरदन-जाफराबाद तालुक्यातील रस्त्यांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर

पतीचे विवाहबाह्य संबंध, मानसिक त्रास अन् छळ; डॉक्टर मनीषा जेजूरकर यांच्या भावाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT