Stone pelting on pune Secunderabad Shatabdi Express crime pune esakal
पुणे

Crime News : सिकंदराबाद - पुणे या धावत्या शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक

सिकंदराबाद - पुणे या धावत्या शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याने एका प्रवासी डब्ब्याची खिडकी फुटली असून सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही.

प्रफुल्ल भंडारी

दौंड : सिकंदराबाद - पुणे या धावत्या शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याने एका प्रवासी डब्ब्याची खिडकी फुटली असून सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. चार दिवसांपूर्वी थांबलेल्या काकीनाडा एक्सप्रेस मध्ये जबरी चोरी झाल्यानंतर ही दगडफेक झाली आहे. सोलापूर - दौंड - पुणे लोहमार्गावर १८ डिसेंबर रोजी भिगवण (ता. इंदापूर) व बोरीबेल (ता. दौंड) रेल्वे स्थानकाच्या दरम्यान शताब्दी एक्सप्रेसवर (क्रमांका १२०२६) ही दगडफेक करण्यात आली. दगडफेकीमुळे सी - ३ या डब्ब्यातील खिडकी क्रमांक ५८ ची बाहेरील काच फुटली. तर आतील काचेला तडा गेला. महिला प्रवासी चंद्रकला यांचे त्या खिडकीजवळ आरक्षण होते परंतु सुदैवाने त्यांना किंवा इतर प्रवाशांना कसलीही इजा झाली नाही.

पुणे रेल्वे स्थानकात या बाबत तक्रार दाखल झाल्यानंतर सदर गुन्हा दौंड रेल्वे सुरक्षा दल पोलिस ठाण्याकडे तपासाकरिता वर्ग करण्यात आला. त्यानुसार अज्ञाताविरूध्द रेल्वे कायदा कलम १५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच दौंड ते भिगवण दरम्यान पाहणी करण्यात आली परंतु लोहमार्ग किंवा परिसरात संशयित व्यक्ती आढळून आली नाही. सदर घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक व्ही. के. सोलंकी यांनी दिली.

१५ डिसेंबर रोजी संध्याकाळी पुणे - सोलापूर लोहमार्गावर बोरीबेल व मलठण (ता. दौंड) रेल्वे स्थानकांच्या दरम्यान काकीनाडा एक्सप्रेस थांबली असता त्यामधील तीन डब्ब्यांमध्ये जबरी चोरी झाली होती. काकीनाडा एक्सप्रेस मधील एका महिला प्रवाशाचे पावणे तीन लाख रूपयांचे दागिने लुटण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी सोलापूर - पुणे लोहमार्गावरील प्रवासी गाडीत जबरी चोरी झाली असताना शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याने रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलिसांनी गस्त वाढविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT