police1.jpg
police1.jpg 
पुणे

जमावाच्या रास्ता रोकोला हिंसक वळण; पोलिसांच्या वाहनावर दगडफेक

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर : कोयत्याने दोन वेगवेगळ्या व्यक्तीच्यांवर वार करणाऱ्या टोळीतील आरोपींना पोलिस पाठीशी घालत असल्याच्या संशयावरुन शंभरहुन अधिक महिला-पुरुषांच्या हिंसक जमावाने रस्ता रोको केले.  हा प्रकार शुक्रवारी (ता. 10) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापुर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील कवडीपाट टोलनाक्यावर घडला. यावेळी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक, पोलिसांना शिवीगाळ व रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाच्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. कोयत्याने मारहाण करणाऱ्या आरोपींवर कायदेशिर कारवाई केल्याचे पोलिस अधिकारी सांगत असतानाही, जमावाने महामार्गावर सुमारे दोन तास गोंधळ घातला.

दरम्यान लोणी काळभोर पोलिसांनी पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुरेखा मकवान यांच्यासह दोन्ही गटातील वीस जनांच्यासह अनोळखी पन्नासहून अधिक जणांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, पोलिसांच्यावर हात उचलणे, सरकारी कामात अडथळा आणणे व हिंसक जमाव जमवून दंगल घडविणे या कलमाखाली शनिवारी (ता. 10) सकाळी गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींच्या अटकेसाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली असून, या प्रकरणात कायदा व सुव्यस्था बिघडवणाऱ्यावर कायदेशीर व गुन्हेगारांच्यावर जरब बसेल अशी कारवाई करणार असल्याची माहिती हवेलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पोटील यांनी दिली. 

लोणी काळभोर पोलिसांनी सुभाष नामदेव घाडगे (रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती ता. हवेली) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संकेत सुनिल गायकवाड, राजु राजेंद्र पवार, ऋुषिकेश पवार, नान्या पारडे व शंकर धायगुडे या पाच जनांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विशेष बाब म्हणजे यातील राजु पवार या आरोपीने गुरुवारी (ता. 9) रात्री किरकोळ कारणावरुन माजी नगरसेविका सुरेखा मकवान यांचा भाऊ, नंदकुमार घाडगे यांच्यावर किरकोळ कारणावरुन कोयत्याने वार वार केला होता. या प्रकरणातून जामिन घेऊन, परत येताच राजु पवार याच्यासह वरील पाच आरोपीनी सुभाष घाडगे यांच्यावर पुन्हा कोयत्याने वार केला. 

तर पुणे-सोलापुर महामार्गावर जमाव जमवून पोलिसांच्या वाहनावर दगडफेक व शिवीगाळ केल्याप्रकरणी व पोलिसांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिस नाईक शंकर तानाजी साळुंखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सुरेखा मकवान यांच्यासह जयसिंग घाडगे, नंदकुमार घाडगे, सुभाष घाडगे, गणेश घाडगे, सचिऩ घाडगे, रमेश घाडगे, जीवण घाडगे, सचिन दाभाडे, बाळासाहेब दाभाडे, अजय मुळेकर, निलेश घाडगे, विलास घाडगे, अनुराग घाडगे, बंटी चव्हाण यांच्यासह चाळीसहुन अधिक अऩोळखी महिला व चाळीसहुन अधिक अनोळखी पुरुषांच्यावर गुन्हे दाखल केला आहे. 

पोलिस सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार, नंदकुमार घाडगे यांचा मुलगा सोहम हा माळऴाडीकडे जात असताना, राजु पवार व सोहम या दोघात गुरुवारी (ता. 9 ) रात्री किरकोळ वाद झाला होता. यावेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या नंदकुमार घाडगे यांच्यावर राजु पवार याने कोयत्याने वार करुन पळ काढला होता. या प्रकरणी घाडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लोणी काळभोर पोलिसांनी राजु पवार याच्यावर गुन्हा दाखल केला होता. राजु पवार यास अटक करुन, न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने शुक्रवारी दुपारी जामिनावर सोडले होते. राजु पवार व त्याच्या काही सहकाऱ्यांच्या विरोधात यापुर्वीही मारामारीचे गुन्हे दाखल असल्याने, राजु पवार व त्याच्या सहकाऱ्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी माळवाडी परीसरातील दोनशेहुन अधिक नागरिक एका ठिकाणी बैठकीसाठी जमले होते. यात सुभाष घाडगे हे बैठकीला हजर होते. बैठक संपवुन नागरिक घरी जात असतानाच, सुभाष घाडगे यांच्यावर मोटारसायकलवरुन आलेल्या वरील पाच जणांनी कोयत्याने वार केला. ही बाब घाराकडे परतणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच, घाडगे यांचे भाऊबंद व मित्र परिवार अशा शंभरहुन अधिक नागरिकांनी पुणे-सोलापुर महामार्गावर कवडीपाट टोलनाक्यावर येऊन पोलिसांच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली.

दरम्यान , ही बाब लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांना संमजताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच दरम्यान आनखी एका पोलिसांच्या शासकीय वाहनातून घटनास्थळी काही पोलिस आले. पोलिस येत असल्याचे लक्षात येताच, जमावाने पोलिसांच्या वाहनांवर हल्ला करुन, वाहनाच्या काचा फोडल्या व वाहनातील पोलिसांना मारहान व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जमाव हिंसक होत असल्याचे लक्षात येताच, पोलिसांनी वाहनासह पळ काढला. याच दरम्यान जयसिंग घाडगे व गणेश घाडगे यांनी जमावास शांत राहण्याचा आवाहन केले. मात्र सुभाष घाडगे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना पोलिस पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत, जमावाने रस्ता रोको करण्यास सुरुवात केली. पोलिस निरीक्षक सुरज बंडगर व त्यांच्या सहकाऱ्यांना जमावाला शांत करण्यारोबरच, घाडगे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना पाठीशी घालणार ऩसल्याचे स्पष्ठ केल्यावर जमाव पांगला. 

आरोपींच्यावर जरब बसेल अशीच कारवाई करणार- पोलिस निरीक्षक सुरज बंडगर

याबाबत बोलतांना पोलिस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले, घाडगे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील पाचही आरोपींमा तातडीने अटक करण्याबरोबरच, त्यांच्यावर जरब बसेल अशी कारवाई कऱण्याच्या सुचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कवडीपाट व परिसरातील सर्वच अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. वरील पाचही आरोपींना पाठीशा घालणाऱ्यांनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तसेच घाडगे व त्यांच्या मित्र परिवाराने रात्री घातलेला गोंधळाची नोंद पोलिसांनी घेतली असुन, याही आरोपींच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांच्यावर हात उचलणे अथवा पोलिसांना शिवीगाळ करणे यासारखी कोणत्याही परिस्थितीत खपवुन घेतली जाणार नाही असेही बंडगर यांनी यावेळी स्पष्ठ केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT