दौंड - मनसे पदाधिकाऱ्यांनी केलेले एसटी बसचे नुकसान.
दौंड - मनसे पदाधिकाऱ्यांनी केलेले एसटी बसचे नुकसान. 
पुणे

दौंडला एसटी बसवरील दगडफेकीत विद्यार्थी जखमी

सकाळवृत्तसेवा

दौंड - एसटी बस वर दगडफेक करून विद्यार्थ्यास जखमी केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील दैनंदिन व्यवहार सुरळीत होते. 

शहरात सोमवारी सकाळी पावणेबारा वाजता मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटसकर, तालुकाध्यक्ष सचिन कुलथे, शहराध्यक्ष जमीर सय्यद यांच्यासह अजहर कुरेशी व एक अनोळखी तरुणाने दौंड - सिद्धटेक - दौंड या एसटी बसवर दगडफेक केली. त्यात श्रीनाथ एन. साळुंखे (वय १७, रा. देऊळगाव राजे, ता. दौंड) हा विद्यार्थी जखमी झाला. तो अकरावीला शास्त्र शाखेत शिकत आहे. बसमधील इतर तीन विद्यार्थी व एक वयोवृद्ध दांपत्य बाकाखाली लपल्याने बचावले. एसटीचा चालकही दगडफेकीतून बचावला. साळुंखे याला पोलिसांनी उप जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी जाण्याची सूचना केली. परंतु, त्याची चाचणी परीक्षा असल्याने त्याने परीक्षेस जाणे पसंत केले. 

दगडफेकीच्या घटनेनंतर एसटी प्रशासनाने शहरात येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना दौंड पीक अप शेड येथे न येण्याची सूचना केली. त्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल झाले.  

बसचे चालक शिवाजी होले यांनी दौंड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पाटसकर, कुलथे, सय्यद, कुरेशी व एक अनोळखी तरुण (सर्व रा. दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणे अंमलदार मारुती हिरवे यांनी दिली. 

दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सभा घेत इंधन दरवाढीचा निषेध केला. आत्माराम ताकवणे, अशोक फरगडे, करीम शेख आदींसह मनसे, एमआयएमचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Latest Marathi News Update: उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

SCROLL FOR NEXT