पुणे

महिलांच्या प्रतिष्ठेवरील आघात थांबवा ः चतुर्वेदी

CD

महिलांच्या प्रतिष्ठेवरील
आघात थांबवा ः चतुर्वेदी

डिजिटल बदनामी प्रकरणी चिंता व्यक्त

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २ ः काही पुरुष ‘एक्स’वर बनावट, फेक अकाऊंट्सद्वारे ग्रोक एआयचा गैरवापर करून महिलांची अल्पवस्त्रांतील छायाचित्रे प्रसारित करीत असल्याच्या प्रकारावर तीव्र आक्षेप घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‘‘काही पुरुष बनावट अकाऊंट्सच्या माध्यमातून ‘एआय ग्रोक’ला छायाचित्रांमधील महिलांचे कपडे कमी दाखविण्यास किंवा त्यांना अश्लील स्वरूपात दाखवण्यास सांगत आहेत. त्याहून गंभीर बाब म्हणजे ‘एआय ग्रोक’देखील महिलांच्या प्रतिष्ठेवर उघडपणे आणि डिजिटल माध्यमातून आघात करणाऱ्या मागण्या मान्य करीत आहे. हा प्रकार फक्त खोट्या खात्यांपुरता मर्यादित नसून, स्वतःचे फोटो टाकणाऱ्या महिलांनाही लक्ष्य केले जात आहे. हा महिलांच्या खाजगीपणाच्या हक्काचा भंग आहे आणि त्यांच्या परवानगीशिवाय फोटो वापरणे हे केवळ अनैतिकच नव्हे तर गुन्हाही आहे. हा मुद्दा एक्स व्यवस्थापनासोबत ठामपणे मांडावा आणि त्यांच्या एआय अ‍ॅप्समध्ये महिलांसाठी एक्स प्लॅटफॉर्म सुरक्षित राखण्यासाठी योग्य सुरक्षा उपाय करण्यास सांगावे,’’ अशी मागणी संसदेच्या माहिती तंत्रज्ञान व दळणवळण विषयक स्थायी समितीची सक्रिय सदस्य या नात्याने चतुर्वेदी वैष्णव यांना एका पत्राद्वारे केली आहे.
महिलांचा अपमान करणाऱ्या, त्यांना कमी लेखणाऱ्या अशाच प्रकारच्या घटना इतर मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवरही दिसून येत आहेत आणि त्यावर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही, याकडेही चतुर्वेदी यांनी लक्ष वेधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Connection Rules : ...तर 'या' ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Virgo Horoscope : कन्या राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मेहनतीचे फळ मिळणार; करिअरमध्ये मोठी उलथापालथ, घरी पैसा येणार

Leo Horoscope : सिंह राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): या आठवड्यात भाग्य तुमच्या पायाशी; धनलाभ योग, स्पर्धा परीक्षेत यश मिळणार

Cancer Horoscope : कर्क राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): सुरुवात कठीण, पण शेवट गाजणार; धनलाभ होईल अन् कामाच्या ठिकाणी मोठी कलाटणी

Gemini Horoscope : मिथुन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): तुमचे निर्णय ठरणार गेमचेंजर; प्रेम, करिअर, पैसा सगळं एकदम हाताला लागणार

SCROLL FOR NEXT