कुकाण्यातील अवैध
व्यवसाय बंद करा ः देशमुख
कुकाणे, ता. २४ ः कुकाणे पोलिस दूरक्षेत्राच्या हद्दीत हाकेच्या अंतरावर बिनधास्तपणे चालणाऱ्या अवैध धंद्यांनी थैमान घातले आहे. बिंगो जुगार, मटका आदी अवैध व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे गावची शांतता धोक्यात आली असल्याने या अवैध व्यवसायावर कडक कारवाई करून हे धंदे बंद करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विलासराव देशमुख यांनी केली आहे.
नेवासे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कुकाणे पोलिस दूध क्षेत्राच्या हद्दीत अवैध धंद्यांनी थैमान घातले आहे. बिंगो जुगार मटका विनापरवानगी दारू विक्री असे अवैध धंदे खुलेआम पोलिस दूरक्षेत्रापासून हाकेच्या अंतरावर बिनधास्तपणे सुरू आहेत. त्यामुळे गावची शांतता धोक्यात येत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा धंद्यांवर पोलिस यंत्रणेचा वचक राहिलेला दिसत नाही. या धंद्यात वाढ होत चाललेली आहे. विशेषतः बिंगो नावाचा जुगार खुलेआम पुणे सुरू असल्यामुळे तरुण बेरोजगार मुले बिंगो खेळाकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे मुलांचे व सुशिक्षित बेरोजगार यांना आर्थिक फटका बसत आहे. दुष्काळी परिस्थितीत दसरा दिवाळी सण या पार्श्वभूमीवर बिंगो या जुगाराने अहोरात्र थैमान घातलेली दिसत आहे. रस्त्याच्या कडेला हा जुगार सुरू असल्यामुळे महिलांना ये-जा करणे मुश्किल झाले आहे,
गांभीर्यपूर्वक काही अनुचित घटना घडण्यापूर्वीच बिंगोवरही त्वरित कारवाई करावी व हा धंदा समोर नष्ट करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनाही निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.