टुडे एक सेकंड मेन
अवकाळीने घेतला तिघांचा बळी
जिल्ह्यात २५ घरांचे नुकसान ः चार तालुक्यांना तडाखा
अहिल्यानगर, ता. १४ ः जिल्ह्यात वादळी आणि वाऱ्याचा चार तालुक्यांना फटका बसला. बुधवारी (ता. १३) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यात वीज पडून दोघांचा, तर एकाचा अंगावर भिंती कोसळून मृत्यू झाला आहे. चार तालुक्यांतील २५ घरांच्या नुकसानीसह ८ लहान-मोठी जनावरे दगावली आहेत.
जिल्ह्यात कडाक्याच्या उन्हानंतर आता वादळी वाऱ्यास सुरूवात झाली आहे. बुधवारी दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत असताना सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदले. काळे ढग दाटून येताच जोरदार वारे सुरू झाले आणि काही क्षणांतच अवकाळी पावसाने जोर धरला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, अनेक मोठी झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर विखुरल्या गेल्या होत्या. जिल्ह्याच्या उत्तर भागातील संगमनेर, राहाता आणि कोपरगाव तालुक्यांतील काही भागात अकाळीसह वादळी वाऱ्यासह वीज पडली. संगमनेर तालुक्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. या वादळामुळे घरांचे नुकसान झाले. तसेच पिंपरणे ते शिबलापूर रस्त्यालगतची अनेक मोठी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मीराबाई सुरेश थोरात (वय ६२, रा. माहेगाव देेवी, ता. कोपरगाव) आणि लता कैलास सोनवणे (वय ४२, रा. लोहारे, ता. संगमनेर) यांच्या अंगावर वीज पडून, तर महादू दगडू माळी (वय ७०, रा. डिग्रस, ता. संगमनेर) यांचा अंगावर भिंत पडून त्यांचा मृत्यू झाला.
संगमनेर, राहाता आणि कोपरगाव तालुक्यांतील ३ मोठी जनावरे तसेच संगमनेर तालुक्यात ५ लहान जनावरे दगावली आहेत. यासह जामखेड तालुक्यात ११, संगमनेर १३ आणि राहाता या ठिकाणी १ घराचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्ती विभागाकडून देण्यात आली.
-------------------
सुरक्षितस्थळांचा आश्रय घ्या
वादळी वारे वाहताना सुरक्षित स्थळांचा आश्रय घ्यावा. घरातील विद्युत उपकरणे बंद ठेवावीत. रस्त्याने प्रवास करताना वाहनाजवळ थांबू नये. सुरक्षित पक्क्या घरांमध्येच आश्रय घ्यावा. आपत्तकालीन परिस्थितीमध्ये जवळचे तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.