broken waterline sakal
पुणे

Waterline : ...गोष्ट फुटलेल्या एका जलवाहिनीची

मागील तीन दिवसांत लाखो लिटर पाणी वाया

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहरात एकीकडे पाण्याची कमतरता भासत आहे, त्यातच शनिवारवाड्याजवळ जलवाहिनी फुटली. या जलवाहिनीतून गेले तीन दिवस लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र ती दुरुस्त होऊ शकत नाही, कारण पोलिस. दुरुस्तीचे काम हाती घेतले की पोलिस तक्रार होते आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना परत जावे लागते. या वादात रस्त्यावरून मात्र शुद्ध पाण्याचे पाट वाहत आहेत.

शनिवारवाड्याच्या मागे महर्षी अण्णासाहेब पटवर्धन चौकातील भूमीगत जलवाहिनी तीन दिवसांपूर्वी फुटली. तेव्हापासून रस्त्यावर पाणी वाया जात आहे. वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहनेही घसरून पडत आहेत. दोन दिवसांपूर्वी महापालिकेचे कर्मचारी दुरुस्तीसाठी आले. मात्र जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी झाड असल्याने ते काम करताना झाड कोसळून घरांचे नुकसान होऊ शकते, अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आली.

त्यानंतर पोलिसांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हे काम थांबविण्याचे तत्काळ आदेश दिले. दुसऱ्या दिवशी झाडाच्या फांद्या काढण्यासाठी उद्यान विभागाचे कर्मचारी संबंधित ठिकाणी आले. फांद्या तोडण्याचे काम सुरू केले. त्यावेळी वाहतूक कोंडी झाल्याने पुन्हा पोलिसांनी त्यांना काम थांबविण्यास सांगितले. त्यामुळे कसेबसे काम पूर्ण करून तेही कर्मचारी माघारी फिरले.

आज रविवार, महापालिकेला सुट्टी. त्यामुळे आजही जलवाहिनी दुरुस्तीचे काम होऊ शकले नाही. परिणामी रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहतच आहेत. सोमवारी (ता. ८) जलवाहिनी दुरुस्त होणार की असेच पाण्याचे पाट वाहत राहणार, हा प्रश्‍न कायम आहे.

जलवाहिनी फुटल्यानंतर अधिकारी दुरुस्तीसाठी गेले. तेव्हा, झाड पडेल म्हणून लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर झाडाच्या फांद्या काढण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांनाही वाहतूक कोंडी होते, असे कारण देऊन पोलिसांनी काम करू दिले नाही. त्यामुळे दुरुस्तीचे काम होऊ शकले नाही. सोमवारी मात्र जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यात येईल.

- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Ganpati Sansthan : सांगली संस्थानचा वाद चव्हाट्यावर! 'युवराज आदित्यराजे हेच कायदेशीर वारस,'; विजयसिंहराजेंची स्पष्टोक्ती, भाग्यश्री यांनी गुरुजींची माफी मागावी

Asian Games: सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडलसाठी सज्ज! भारतीय हॉकी संघ ऑलिंपिक पात्रतेसाठीही प्रयत्न करणार; पाहा Schedule

Moon Discovery: चंद्रावर सापडले प्रचंड विवर! ७२८ फूट रुंद, १४१ फूट खोल; दोन वर्षांपूर्वीच्या उल्कापाताचा थरारक पुरावा

Marathi News Live Updates : आमच्या विरोधात कटकारस्थान, या मागे नेपाळी कनेक्शन; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

SCROLL FOR NEXT