आळेफाटा, ता. ९ : इराण-इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईत अडकलेले जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील उद्योजक राजेंद्र जाधव यांच्यासह त्यांचे कुटुंब शुक्रवारी (ता. ६) सुखरूप मायदेशी परतले. विमानसेवा विस्कळित झाल्याने हे कुटुंब गेल्या काही दिवसांपासून तिथे अडकून पडले होते.
आळेफाटा येथील उद्योजक राजेंद्र रमेश जाधव, पत्नी संगीता आणि मुलगी स्नेहल यांच्यासह २६ फेब्रुवारीला दुबई पर्यटनासाठी गेले होते. २८ फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्याने तणाव वाढला. बुर्ज खलिफा परिसरात असताना त्यांना मिसाईल हल्ल्याचा थरार प्रत्यक्ष अनुभवावा लागला. यामुळे घाबरलेल्या जाधव कुटुंबाने तातडीने हॉटेल गाठले. युद्धामुळे विमानसेवा ठप्प झाल्याने त्यांना मायदेशी परतण्यात अडचणी येत होत्या. या काळात माजी आमदार अतुल बेनके, अमित बेनके यांच्यासह इतरांनी त्यांना धीर दिला. प्रशासकीय स्तरावरील प्रयत्नांनंतर, गुरुवारी (ता. ५) ते दुबईहून निघाले आणि शुक्रवारी मध्यरात्री पुणे विमानतळावर सुखरूप पोहोचले. मायदेशी परतल्यानंतर जाधव कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.