पुणे

नियम म्हणजे नियम...पुण्यात रुग्णवाहिका चालकाला हेल्मेट नसल्याचा दंड

दंडाची नोटीस रुग्णवाहिका मालकाला पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव यांच्याकडून मिळाली.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : पुणे शहर वाहतूक पोलिसांचा अजब कारभराने हसाव की रडाव असा प्रश्न पडतो. चक्क रुग्णवाहिका चालकाला हेल्मेट नसल्याने पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्या दंडाची नोटीस रुग्णवाहिका मालकाला पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव यांच्याकडून मिळाली आहे.

मांजरी येथील नाथा उंदरे यांनी आमदार विलास भाऊ लांडे ग्रामीण सेवा प्रतिष्ठाण नावाने रुग्णवाहिका ( एम एच 12, एफ सी 9784 ) सुरू केली. ही रुग्णवाहिका वाघोलीतील केअर रुग्णालयासमोर सेवा देण्यासाठी उभी असते. 13 ऑक्टोबर 2021 रोजी रुग्णवाहिका चालक ऋषीकेश पवार यांनी हेल्मेट परिधान न केल्याने 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. वाहतूक महिला कर्मचाऱ्याने ई चलन द्वारे हा दंड ठोठावला. सायंकाळी सात वाजून 28 मिनिटांची वेळ होती. ठिकाण सी सी टीव्ही ( पी एन सी ) ( --- ) असे नमूद करण्यात आले आहे. शनिवारी ( दि 27 ) रुग्णवाहिका मालक नाथा उंदरे यानायाबाबतची नोटीस मिळाली.

ही नोटीस बघून हसू की रडू असा प्रश्न त्यांना पडला. विधी सेवा प्राधिकरणाचे कलम 20 ( 2 ) अन्वये ही नोटिस काढण्यात आली. मोटार वाहन कायदा कलम 129 / 177 नुसार हा दंड ठोठविण्यात आला. दावा दाखल करण्यापूर्वी लोकअदालीत तो यावा यासाठी ही नोटीस बजावल्याचा त्यात उल्लेख करण्यात आला. आपण दंड भरल्यास लोकअदालीत जाण्याची गरज नाही. असेही त्यात नमूद करण्यात आले. या नोटीस मध्ये आपण वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे फोटो बरोबर जोडण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र नोटीस बरोबर फोटो मिळाला नाही. वाहतूक पोलिसांना वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी कारवाई करण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध झाले असले तरी कारवाई करताना ती बरोबर झाली याची तरी खात्री करायला हवी अशी अपेक्षा अन्य रुग्णवाहिका चालकांनी व्यक्त केली.

त्या इई चलन सोबत कारवाईची पूर्ण माहिती फोटो सह असते. फोटो तर नाहीच शिवाय ठिकाण सी सी टीव्ही ( पी एन सी ) ( --- ) असे नमूद करण्यात आले. आता हे ठिकाण कोणते याचा शोध घेण्याची वेळच मालक व चालक यांच्यावर आली. असेच म्हणावे लागेल.

वाहतूक पोलिसांचा हा अजब कारभार पाहून खरच हसावं की रडावं असा प्रश्न पडला. वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा. मात्र योग्य कारवाई करा.तंत्रज्ञानचा वापर करून अशा प्रकारे कारवाई झाल्यास वाहनचालकांना उगाच भुर्दंड बसेल.

-- नाथा उंदरे,

रुग्णवाहिका मालक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साताऱ्यात खळबळ! कराडच्या पाचुपतेवाडीत पुणे डीआरआयकडून छापेमारी, ६ हजार काेटींचे ड्रग्ज जप्त, कारखाना केला सील..

'मेगाब्लॉक होता, मग गाडी रद्द का केली नाही?' साडेचार तास एकाच ठिकाणी अडकली अजनी-पुणे 'वंदे भारत'; प्रवाशांचा संताप

उमेदवारांनो सावधान..! निवडणुकीच्या प्रचाराचा खर्च सव्वापाच ते साडेसात लाखांवर नकोच; चहा ८ रुपये, जेवण ७५ रुपये, बिर्याणी ७० रुपये अन्‌...

Republic Day 2026 Special Recipe: प्रजासत्ताक दिनासाठी परफेक्ट रेसिपी! तिरंग्याच्या रंगात रंगलेलं स्वादिष्ट सँडविच, लगेच ट्राय करा

Financial Independence : वैयक्तिक आर्थिक प्रजासत्ताकासाठी पाच संकल्प; आर्थिक स्वातंत्र्याची वाटचाल

SCROLL FOR NEXT