Electricity-Bill 
पुणे

महावितरणचा अजब कारभार; बील भरूनही तोडले वीज कनेक्शन 

सकाळवृत्तसेवा

कात्रज - मागील काही दिवसांपासून सातत्याने महावितरणच्या अजब कारभाराची उदाहरणे समोर येत आहेत. अशात कात्रज परिसरातील सुखसागर नगरमधील ऑडी आर्केड सोसायटीतील शॉप क्रमांक ११च्या मालकांना कुठलीही कल्पना न देता वीज कनेक्शन तोडल्याची घटना समोर आली आहे.

वीजबील भरण्याच्या अंतिम तारीखेपूर्वीच ३ दिवस आधी महावितरणकडून वीज कनेक्शन तोडण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. वीजबील भरण्याची अंतिम तारीख ही २२ मार्च होती अशात ग्राहक प्रकाश ढमढेरे यांच्याकडून चेक पेमेंट करण्यात आले होते. दोन दिवसांनी चेक जमाही झाला. मात्र, त्याआधीच १७ मार्चला वीज कनेक्शन कमी करण्यात आले.

वीजबील भरून कुठलीही नोटीस न देता वीज कनेक्शन तोडल्याने ग्राहकांकडून संताप व्यक्त होत आहे. कात्रज परिसरात वीजेच्या लंपडावामुळे आधीच नागरिक त्रस्त असताना वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याचे प्रकार घडल्याने नागरिकांमधून आणखीनच नाराजी व्यक्त होत आहे.

महावितरणच्या या अनागोंदी कारभाराला सर्वस्वी अधिकारी जबाबदार आहेत. सर्व गोष्टी ऑनलाईन चेक करता येत असताना सुद्धा असे प्रकार घडतात. याचा ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
- प्रकाश ढमढेरे, ग्राहक

ग्राहकाचा मोबाईल क्रमांक अपडेट नसल्यामुळे हा गोंधळ उडाला होता. त्यामुळे वीज कनेक्शन तोडण्यात आले. आता लवकरात लवकर वीज कनेक्शन जोडण्यात येईल.
- एस. एस. भोरे शाखा अभियंता, कात्रज विभाग, महावितरण

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT