Police 
पुणे

गळफास घेतलेला मृत्यूदेह आढळला; पण पोलिसांनी नोंद केली आकस्मात मृत्यूची

सकाळवृत्तसेवा

वालचंदनगर - भरणेवाडी (ता. इंदापूर) येथील तरुणाचा मृतदेह सणसरजवळील ३९ फाटा येथ मित्राच्या घराजवळ गळफास घेतल्याच्या अवस्थेमध्ये आढळल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र नातेवाईक व कुंटूबातील नागरिकांनी संशयास्पद मृत्यू असल्याचा संशय असून सलोख तपास करण्याची मागणी केली. या घटनेमुळे तणावाचे वातावरण झाले हाेते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भरणेवाडीमधील आप्पा राव भरणे (वय ४०) या तरुणाना मृतदेह आढळला. आप्पा भरणे व  सणसर जवळील ३९ फाट्याजवळ नितीन काळे हे दोघे मित्र होते. काळे यांच्या घराजवळील कामगारांसाठी राहणाऱ्या खोल्या व गावरान काेंबड्याची पोल्ट्री आहे.  आज गुरुवार (ता.१०) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रिना नितीन काळे (वय ३९) यांना आप्पा भरणे यांनी लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहय्याने गळफास घेतल्याचे दिसले. रिना काळे यांनी मुलीच्या मदतीने भरणे  यांचा फास सोडवून त्यांना खाली घेवून सदरची घटना पती नितीन काळे व पोलिसांना सांगितली. याप्रकरणी रिना काळे यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात मध्ये भरणे यांच्या मृत्यूची खबर दिली आहे. मात्र, आप्पा भरणे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली नसून त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप भरणे यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

भरणे यांच्या नातेवाईकांनी सुरवातील मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यामुळे तणावाचे वातावरण झाले होते. मात्र रात्री उशीरा मृतदेह ताब्यात घेतला असून मृत्यूची सलोख चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक फौजदार प्रभाकर बनकर करीत आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT