वाहतूक कोंडी sakal
पुणे

सातारा रस्त्यांवर भटक्या जनावरांमुळे वाहतूकीस अडथळा

दक्षिण पुण्याचे प्रवेशद्वार समस्येच्या विळख्यात; महापालिकेचे दुर्लक्ष

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज : सातारा रस्त्यावर जनावरांच्या कळपाचा वावर नित्याचाच झाला आहे. हा रस्ता रहदारीचा असून यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. भटक्या जनावरांचा कळप अनेकदा रस्त्यांच्या मधोमध ठाण मांडून बसलेला दिसतो. आधीच रस्ता अरूंद त्यात त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. महापालिकेच्या कोंडवाडा विभागाचे याकडे सरासर दूर्लक्ष होत असून वाहतूक कोंडीने वाहतूकदारांची डोकेदुखी वाढली आहे.

मोकाट जनावरांच्या मालकांना कोणाचीही भीती राहिलेली नसून त्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिक सांगतात. परंतु, महापालिकेने दुर्लक्ष केल्याचे परिणाम पादचारी, वाहनचालकांवर होत असून त्यांना होणाऱ्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. तसेच, कात्रज भारत पेट्रोलपंप शेजारी अनेक महिन्यांपासून पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे ते डासांच्या उत्पत्तीचे ठिकाण बनले असून नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे.

कात्रज ते गुजरवाडी फाट्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा घाणीचे आणि राडारोड्याचे साम्राज्य झाले असून याकडेही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहराच्या दक्षिण प्रवेशद्वारावर घाणीचे साम्राज्य असल्याचे चित्र आहे. याठिकाणी असलेल्या कचऱ्याभोवती डुकरांचाही सुळसुळाट झाला असून महापालिकेने भटक्या जनावरांसोबत डुकरांचाही बंदोबस्त करून परिसर स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

"सध्या पावसाळ्याचे दिवस असून येथील कचरा तसेच राडारोड्यामुळे पावसाचे पाणी अनेक दिवस साठून राहिल्यामुळे आरोग्याचा प्रश्न उभा राहतो. जनावरांकडून अचानक हल्ला झाल्यास जबाबदार कोण? अशा भटक्या जनावरांच्या विरोधात कारवाई करण्यात महापालिकेकडून दूर्लक्ष होत आहे."

- आदित्य कैलास गायकवाड, नागरिक.

"कात्रज परिसरात सातत्याने कारवाई होत असते. मागील काही दिवसांत अनेकवेळा कारवाई करण्यात आली आहे. सातारा रस्त्यांवरील मोकाट जनावरांचाही शोध घेऊन कारवाई करण्यात येईल."

- मारुती हनमघर, आरोग्य निरिक्षक, कोंडवाडा विभाग, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT