पुणे

लोकशाही संस्था पारदर्शक हव्यात ः बिर्ला

CD

लोकशाही संस्था पारदर्शक हव्यात ः बिर्ला

राष्ट्रकुल देशांच्या संसद प्रमुखांच्या परिषदेचा समारोप

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १६ ः- ‘‘पारदर्शकता, समावेशकता तसेच जनतेप्रती उत्तरदायी राहूनच लोकशाही संस्था सशक्त आणि सुसंगत राहू शकतील,’’ अशा शब्दांत लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकशाही संस्थांना अधिक लोककेंद्री बनवण्याची गरज व्यक्त केली. राष्ट्रकुल देशांच्या संसद प्रमुख व पीठासीन अधिकाऱ्यांच्या २८ व्या परिषदेचा समारोप प्रसंगी त्यांनी हे प्रतिपादन केले.
संसद संकुलातील संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल देशांच्या संसद प्रमुख व पीठासीन अधिकाऱ्यांच्या २८ व्या परिषदेचा समारोप आज झाला. या परिषदेचे यजमान व अध्यक्ष असलेले लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी २९ व्या परिषदेचे अध्यक्षपद इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष माननीय सर लिंडसे होयल यांच्याकडे सुपूर्द केले.
परिषदेचा समारोप करताना लोकसभाध्यक्ष बिर्ला यांनी लोकशाही संस्थांच्या निर्णयप्रक्रिया व कार्यपद्धतीत खुलेपणा आणण्याची आवश्यकताही व्यक्त केली.
सीएसपीओसीच्या इतिहासातील सर्वाधिक देशांचा अभूतपूर्व सहभाग हे या परिषदेचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
‘राष्ट्रकुल देश शांतताप्रिय’
ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष सर लिंडसे होयल यांनी लंडनमध्ये होणाऱ्या २९ परिषदेसाठी सर्व संसद प्रमुख व पीठासीन अधिकाऱ्यांना निमंत्रण देताना जागतिक पटलावरील चिंताजनक घडामोडींवर सूचक भाष्य केले. होयल यांनी टिप्पणी केली, की जगातील अनेक देश सतत भांडणे आणि संघर्ष करत असतात, मात्र राष्ट्रकुल देश राष्ट्रकुल देशांचे सदस्य शांतताप्रिय आहेत. भारताच्या अध्यक्षतेखाली सीएसपीओसी अधिक मजबूत करण्यासाठी झालेल्या प्रयत्नांची त्यांनी जोरदार प्रशंसा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे नियम माहिती नसतील तर नुकसान होऊ शकते, खरेदीपूर्वी नक्की वाचा!

Kolhapur Police Recruitment : कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा उद्या; ८८ पदांसाठी ११३५ उमेदवार मैदानात

Latest Marathi News Live Update : परळीच्या धारावती तांड्यावर 16 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना

Multibagger Stock: ₹11 चा शेअर थेट ₹1100 वर! 1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी 10 लाख; 5 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल

Kolhapur Water Project : ‘धामणी’चे अतिरिक्त पाणी करवीर तालुक्याला द्यावे; तर, कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय हवे - नरके

SCROLL FOR NEXT