पुणे

अरेरावी करणाऱ्या वाहनचालकांवर आता कडक कारवाई 

सकाळवृत्तसेवा

पुणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाहनचालकांकडून हुज्जत घालण्यापासून मारहाण करण्यापर्यंतच्या प्रकारात वाढ होत आहे. दर दिवशी पोलिसांबरोबरील वादाच्या घटना शहरात घडत आहेत. परंतु आता अरेरावी करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे. 

वाहतूक शाखेकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मागील काही महिन्यांपासून जोरदार कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबर वाहनचालकांचे दररोज वादविवाद होत आहे. अनेकदा हे वाद जीवघेण्या हल्ल्यापर्यंत जात असल्याची सद्यस्थिती आहे. 

सातपुते म्हणाल्या, "नियमभंग केल्यामुळे कारवाई केली जाते. असे असताना काही वाहनचालक पोलिसांशी हुज्जत घालतात. शिवीगाळ करण्यापासून ते जीवघेणा हल्लाही केला जातो. अशा वाहनचालकांची कदापी गय केली जाणार नाही. त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत. आता बॉडी कॅमेऱ्यामुळे संबंधित वाहनचालकाविरुद्ध कारवाई करण्यास चांगली मदत होईल.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MG Road वरील खाऊ गल्लीत FDA ची धडक कारवाई; परवाना नसलेल्या पाच खाद्यविक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश

Yuzvendra Chahal 400 T20 Wickets: युझवेंद्र चहलने इतिहास रचला... ट्वेंटी-२०मध्ये असा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज

Youngest Demat Account Holder : वय अवघे ६ दिवस अन् थेट शेअर बाजारात एन्ट्री! १२ दिवसांचा जुना रेकॉर्ड मोडत दिल्लीच्या चिमुकल्याने रचला नवा विश्वविक्रम

Sudhir Mungantiwar : "आपलं सरकार इंग्रजांपेक्षाही वाईट..."; सुधीर मुनगंटीवार आक्रमक, मुख्यमंत्र्यांसमोरच मांडली भूमिका, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : सोनं-चांदी दरात पुन्हा घसरण; सोनं 2 हजार 800 रुपयांनी तर चांदी चार हजार रुपयांनी घसरली

SCROLL FOR NEXT