manjari1.jpg 
पुणे

पुण्यातील "या' भागात दहा दिवस असणार कडक बंद 

सकाळवृत्तसेवा

मांजरी खुर्द (पुणे) : मागील आठ दिवसात मांजरी खुर्द (ता. हवेली) गावात तीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे 21 मे पर्यंत गाव शंभर टक्के बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, गावामध्ये कोरोना वॉरिअर्स स्वयंसेवकांची टीम स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत दररोज सकाळी 9 ते 11 अशी दोन तास नागरिकांना घरपोच सेवा पुरविण्यात येत आहे. 

गावात एका महिला डॉक्‍टरसह तिघे जण कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यापैकी एक सत्तर वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांशी संबंधित चाळीस जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.

मात्र, ग्रामस्थांकडून हा नियम पायदळी तुडवला जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने गावात प्रस्थान व प्रवेश बंदी बरोबरच ग्रामस्थांना खरेदी विक्रीसह विनाकारण बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचे सरपंच प्रतिमा उंद्रे यांनी सांगितले. 

नागरिकांना आवश्‍यक साहित्याची मागणी करण्यासाठी गावातील सर्व दुकानांची नावे व संपर्क नंबर तसेच त्यांच्या प्रभागात नेमलेल्या स्वयंसेवकांची माहिती घरोघर पोहोचविण्यात आली आहे. गावात एकूण पाच प्रभाग असून प्रत्येक प्रभागासाठी एक प्रमुख नेमण्यात आला आहे. 


पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

या प्रत्येक प्रमुखांसह चार ते अकरा पर्यंत स्वयंसेवक निवडण्यात आलेले आहेत. नागरिकांनी दुकानदारांना दिलेल्या ऑर्डरनुसार स्वयंसेवक हा माल संबंधित घरी पोचवत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Semi Final : २२ वर्षीय Phoebe Litchfield भारी पडली; पेरी, गार्डनर यांची तुफानी खेळी, भारतासमोर ३००+ धावांचे लक्ष्य

Latest Marathi News Live Update : पालीतील कॅनरा बँक फोडली, साडेअठरा लाखांची रोकड लंपास

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..

...म्हणून अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने मुंबई कायमची सोडली; स्वतः कारण सांगत म्हणाली, 'मी जुहूवरुन सगळीकडे...'

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव “फिल्म बाजार- २०२५”साठी शासनामार्फत "मुक्काम पोस्ट देवाचे घर" चित्रपटांची निवड

SCROLL FOR NEXT