pune sakal
पुणे

सुरक्षित पुण्यासाठी हवी कठोर मोहीम

शहराच्या कोणत्याही भागात मुली दुचाकीवरून सहज फिरू शकतात,’ ही पुण्याची आजवरची ख्याती

संभाजी पाटील @pambhajisakal

पुणे : मध्यरात्री नंतरही शहराच्या कोणत्याही भागात मुली दुचाकीवरून सहज फिरू शकतात,’ ही पुण्याची आजवरची ख्याती. सर्वात सुरक्षित शहर म्हणूनच जगभरातील पालक मोठ्या विश्वासाने आपल्या मुला-मुलींना शिक्षणासाठी पुण्यात पाठवतात. पण शहाराची प्रवेशद्वारे असणाऱ्या विमानतळ, रेल्वे स्थानके, एसटी स्थानकांच्या बाहेरचे वातावरण सुरक्षित शहराच्या प्रतिमेला पहिला धक्का देतात. त्यामुळे ‘सुरक्षित पुण्यासाठी’च्या उपाययोजनांमध्ये ही सर्व ठिकाणी अधिक सुरक्षित, शिस्त आणि कायद्याचे पालन करणारी व्हायला हवीत.

पुणे रेल्वे स्थानक परिसरात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. आतापर्यंत तब्बल १६ आरोपी यात सामील असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या घृणास्पद आणि शहराला काळिमा फासणाऱ्या घटनेबद्दल वरवरच्या मलमपट्टीच्या उपाययोजना करून चालणार नाही, तर पुणे शहर हे इतर महानगरांपेक्षा वेगळे आणि सुसंस्कृत शहर आहे. येथे चुकीच्या वागणाऱ्यांवर तत्काळ कडक कारवाई होते, हा संदेश अशी कृत्य करणाऱ्या नराधमांसह बाहेरून येऊन नियम न पाळणाऱ्या प्रत्येकापर्यंत जायला हवा.

काही दिवसांपूर्वी विमानतळावरून घरी येण्यासाठी विमानतळाबाहेर सहज रिक्षाची चौकशी केली. एकही रिक्षाचालक मीटरवर येण्यास तयार नव्हता. कात्रजला जाण्यासाठी एकाने नऊशे, एकाने साडेआठशे रुपये सांगितले. एवढे का? विचारताच एकजण अतिशय घाणेरड्या पद्धतीने बोलला, मी पुण्यातलाच असल्याने माझ्या भाषेत मी त्याला उत्तर दिले. पण बाहेरच्या व्यक्तींचे काय होतं असेल? हा अनुभव सांगण्याचा हेतू एवढाच की, विमानतळ असो, रेल्वे स्टेशन की एसटी स्टँड सर्वत्र हीच अवस्था आहे.

रात्रीच्या वेळी तर या ठिकाणचे अनुभव भयंकर असतात. मग आपले पोलिस प्रशासन, आरटीओ या यंत्रणा करतात काय? एकतर रिक्षाचालक, टॅक्सी ड्रायव्हर यांनी गणवेश घालणे, बॅज लावणे सक्तीचे आहे. पण त्याचे पालन होत नाही. सर्व स्थानकांवर प्रिपेड रिक्षा, टॅक्सी उपक्रम सुरू केला होता, बहुतेक ठिकाणी तो बंद आहे. कोणीही उठतो, त्याला हवे ते पैसे सांगतो यावर कोणाचेही नियंत्रण नाही.

रिक्षाचालक, कॅब यांची नियमित तपासणी होत नाही. प्रवासी नाकारणे, त्यांच्याकडून जादा पैसे वसूल करणे, त्यांना रस्त्यात लुटणे अशा अनेक प्रसंगाची पोलिसांकडे नोंद नसते किंवा कोणतीही गंभीर कारवाई होत नाही. कायद्याचा धाक, भीती न उरल्यानेच १६ जण उघडमाथ्याने मुलीवर ठिकठिकाणी अत्याचार करण्याचे धाडस करतात. हे न पटणारे आहे, यंत्रणांचे अपयश आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वांनी संवेदनशील होऊन काम करावे लागेल.

पुण्यात डॉ. बाबा आढाव यांनी रिक्षाचालकांची सुसंस्कृत संघटना उभी केली. त्यांच्यावर मूल्यांचे संस्कार केले, मात्र सध्याची परिस्थिती बिघडलेली दिसते. संघटनांचाही धाक, दबाव कमी झालेला दिसतो. परमीट एकाचे आणि व्यवसाय करणारा चौथा-पाचवा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे संघटनांनी पुनर्बांधणी करून चुकीच्या लोकांना बाहेर काढायला हवे. हे शहर आपले आहे, ते सुरक्षित राहिले नाही तर कधी ना कधी त्याची झळ प्रत्येकाच्या घरापर्यंत बसणार आहे, हे भान ठेवून योग्य त्या सुधारणा होतील, अशी अपेक्षा आहे.

हे नक्की करा

  1. प्रवासी वाहतूक करणाऱ्यांसाठी गणवेश बॅजची सक्ती

  2. अनधिकृत रिक्षा चालकांवर कडक कारवाई

  3. स्थानकांवर २४ तास पोलीस बंदोबस्त आणि मदत केंद्र

  4. रिक्षा कॅब चालकांसाठी सतत प्रशिक्षण

  5. लॉज , छोट्या हॉटेलसाठी नियमावली

  6. हप्ते घेऊन दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT