Coronavirus Sakal
पुणे

ग्रामीण भागातील कडक निर्बंध किमान आठवडाभर कायम राहणार

पुणे शहर व पिंपरी-चिंचवडपाठोपाठ आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांचा दर (कोरोना पॉझिटिव्हिटी रेट) हा सात टक्क्यांच्या आता आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहर (Pune City) व पिंपरी-चिंचवडपाठोपाठ (Pimpri CHinchwad) आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांचा दर (कोरोना पॉझिटिव्हिटी रेट) (Corona Positivity Rate) हा सात टक्क्यांच्या आता आला आहे. मात्र, तरीही किमान आठवडाभर ग्रामीण भागातील कडक निर्बंध (Restrictions) कायम राहणार आहेत. ग्रामीण भागातील निर्बंध शिथिलतेबाबतच्या निर्णय येत्या शुक्रवारी (ता. २५) पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. या वृत्ताला जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. (Strict Restrictions in Rural Areas will Remain in Place Last Week)

शहर व पिंपरी-चिंचवडमधील कोरोना बाधितांचा दर हा दहा दिवसांपूर्वीच पाच टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे मागील दहा दिवसांपासून या दोन्ही शहरांतील निर्बंध शिथिल केले आहेत. त्याचवेळी ग्रामीण भागातील हा दर दहा टक्क्यांहून अधिक होता. त्यामुळे येथील निर्बंध अद्याप कायम आहेत.

निर्णयाबाबत उत्सुकता

उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार हे दर शुक्रवारी शहर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीत स्थिती जाणून घेऊन त्यावर निर्णय घेण्यासाठी आढावा बैठक घेत असतात. मागील सलग दोन आढावा बैठकींत ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांचा दर जास्त असल्याने तेथील कडक निर्बंध शिथिल करता आलेले नाहीत. राज्य सरकारने पूर्वी नियम शिथिल करण्यासाठी बाधितांचा दर किमान दहा टक्के असणे अनिवार्य केले होते. त्यामुळे सलग दोन बैठका होईपर्यंत ग्रामीणमधील हा दर दहा टक्क्यांवर आला नव्हता. आता मात्र तो दहा टक्क्यांहून खूपच कमी झाला आहे. त्यामुळे दिलासा देणारा निर्णय होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Resignation : क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब? अजित पवार–फडणवीस भेटीने खळबळ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील रितेशचा फस्ट लूक समोर, वाढदिवसादिवशी पोस्ट करत म्हणाला, 'क्षणभर थांबलेला सूर्य आणि...'

Ind vs SA 4th T20 : मालिका विजयासाठी भारताला विजय आवश्यक; सॅमसनला आज तरी मिळेल का संधी? कशी असेल प्लेईंग XI?

VIDEO : 15 वर्षांच्या संसाराचा अंत? हॉटेलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबत पत्नी सापडली रंगेहाथ; पती रडत रडत म्हणाला, 'दुपारी ३:३० च्या सुमारास..'

Chandrashekhar Bawankule: नागपूरसह राज्यात महायुती मजबूत : चंद्रशेखर बावनकुळे; ५१ टक्क्यांहून अधिक मतांसह महायुती सत्तेत येईल!

SCROLL FOR NEXT