bsnl sakal
पुणे

'बीएसएनएल'च्या अधिकाऱ्यांची विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने

अखिल भारतीय पदवीधर अभियंता आणि दूरसंचार अधिकारी संघटनेतर्फे (ऐआयजीइटीओ) सातारा रस्त्यावरील बीएसएनएलच्या मुख्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - भारत सरकारची सार्वजनिक उद्योग क्षेत्रातील दूरसंचार कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेडमधील (बीएसएनएल)अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. २४) विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने केली.

अखिल भारतीय पदवीधर अभियंता आणि दूरसंचार अधिकारी संघटनेतर्फे (ऐआयजीइटीओ) सातारा रस्त्यावरील बीएसएनएलच्या मुख्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली. बीएसएनएलच्या नवीन मनुष्यबळाच्या धोरणांतर्गत अधिकाऱ्यांची कमी केलेली पदे पुर्ववत कायम ठेवावीत, पदोन्नतीच्या करण्यात आलेल्या मर्यादित संधी रद्द करून पुन्हा पूर्वीप्रमाणेच पदोन्नतीचे धोरण कायम ठेवावे आदी प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यासाठी हे आंदोलन कऱण्यात आले. यावेळी नवीन धोरणाचा निषेधही करण्यात आला. नवीन धोरणामध्ये बाह्य भरतीद्वारे अधिकारी घेण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी संबंधित धोरणाच्या प्रती जाळून निषेध नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाचे शेवटचे दोन दिवस; श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT