structural audit of advertisement in baramati action against 70 hoarding pune Sakal
पुणे

Baramati News : बारामतीत 70 बेकायदा होर्डिंग्जची उभारणी...

बारामती नगरपालिकेने सर्व होर्डिंगधारकांना आतापर्यंत दोन वेळा नोटीस दिल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सकाळ वृत्तसेवा

बारामती - मुंबईतील धोकादायक होर्डिंग्जमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला, बारामतीतही लावलेली बहुसंख्य होर्डिग्ज बेकायदा लावलेली असून वादळात या होर्डिंग्जमुळेही दुर्घटना घडू शकते. दरम्यान एकाही होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीटही केलेले नसल्याची बाब आता पुढे आली आहे.

एकट्या बारामती शहरात जवळपास 70 होर्डिंग्ज असून एकाही होर्डिंगला रितसर परवानगी घेतली नसल्याची बाब आता पुढे आली आहे. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनीही याला दुजोरा दिला आहे. या बाबत बारामती नगरपालिकेने सर्व होर्डिंगधारकांना आतापर्यंत दोन वेळा नोटीस दिल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.

खाजगी मालमत्तेच्या ठिकाणी होर्डिंग्ज लावलेले असले तरी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी आवश्यक असते, बहुसंख्य होर्डिंग्जबाबत परवानगीच घेतलेली नसल्याची बाब पुढे आली आहे.

बारामती नगरपालिकेने मध्यंतरी होर्डिंगच्या दराबाबत धोरण निश्चित केले, त्या नंतर हे दर चढे असून ते कमी करण्याची मागणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र नगरपालिकेने कोणालाही परवानगीच दिली नसल्याची बाब आता पुढे आली आहे.

अनेक वर्षे बेकायदा होर्डिंग उभारून त्यातून उत्पन्न प्राप्त केल्यानंतर आता नगरपालिकेने पूर्वलक्षी प्रभावाने यात वसूली करण्याची बाब लोक बोलून दाखवित आहेत. बारामतीहून बाहेर जाणा-या मोरगाव, फलटण, नीरा, इंदापूर, पाटस, भिगवण अशा सर्वच रस्त्यांवर मोठ्या संख्येने होर्डिंग्ज असून याचे स्ट्रक्चरल ऑडिट व त्याची कायदेशीर परवानगी तपासून घेण्याची मागणी होत आहे.

अनेक होर्डिंग्ज महामार्गालगत असून वादळामुळे दुर्घटना घडल्यास रस्त्यावरुन जाणा-या वाहनचालकांच्या जीवावर बेतू शकते इतक्या मोठ्या आकाराची होर्डिंग्ज अनेक ठिकाणी लावण्यात आली आहेत. याची कायदेशीर बाजू व सुरक्षितता दोन्हींची जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशीही मागणी आहे.

- मिलिंद संगई, बारामती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये निरीक्षण गृहतून मुलगी बेपत्ता, सुरक्षा यंत्रणेवर उठले सवाल

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Trade Ban : तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT