माझी कविता
धरणग्रस्त
भरलेला संसार आमचा
उद्ध्वस्त करून टाकला
नव्या पिढीच्या स्वप्नांना
सुरूंगच जणू लावला !! 1!!
पिढ्यापिढ्यांची मिळकत सोडली
धरणाच्या मोठ्या भिंतीसाठी
शेती, घरे, गावेही विसरली
स्वप्नातील जिंदगीसाठी। !!2:!!
राष्ट्रहितासाठी हजारोंनी
थोडा थोडा केला त्याग
धरणग्रस्तांच्या स्वप्नांसाठी
सरकारला कधी येणार जाग? !! 3!!
अपूर्ण राहिली खरी
विकासाची स्वप्ने आमची
आंदोलने, उपोषणे आता
आम्ही किती करायची ? !!4!!
कुठे वीज तर कुठे सिंचन
फुलविले कोणी नंदनवन
संसार ज्यांचे बुडाले तो
भूमिपुत्र फिरतोय अजुनही वणवण !! 5!!
- संतोष राऊत, लोणंद
29581
-------------------------
वड महाराजा...
वडाच्या झाडाखाली उभी ती
हातात पूजेचं ताट अन् मनात वादळ
सावित्रीसारखी दिसते खरी
पण डोळ्यांत प्रश्नांचं जळजळ
का फक्त मीच व्रत करावं?
का फक्त माझं प्रेम तपासावं?
सत्यवानाला आणलं माघारी
पण त्यालाच का मी पूजावं?
वड महाराजा ऐक जरा
बास हे फेऱ्याचं नाटक जरा
शतकानुशतकं याच विचारात जगले
स्वतःच अस्तित्वच हरवून बसले
प्रश्न निचा धारधार शब्द तिचे वीज
मनात रोवलंय नव्या विचारांचे बीज
शब्द तिचे ऐकून क्षणभर धबकला वड ही
विजेसारख्या शब्दांनी चिरला हिख्या पानांचा अभिमानही
ज्या सावलीत गप्प बसण्याची सवय होती
तिथंच विचारांची वादळं उसळली होती
‘वड महाराजा,’ ती ठामपणे म्हणाली,
आशीर्वाद दे पण बंधन नको
मी प्रेम करीन, साथ देईन पण स्वतःला हरवणं आता नको
शतकांचा भार वाहणारा वडही झुकला
कारण आज पहिल्यांदा स्त्रीपुढे नाही तर स्त्रीसोबत उभा राहिला
विचारांच्या फांद्या विस्तारून बदलाचा हुंकार स्वीकारला
- प्रीतम फिसरेकर, सातारा
W29582
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.