पुणे

उंबरे येथे युवाशक्तीकडून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव

CD

नसरापूर, ता. २६ ः उंबरे येथील संतसेवा संघाच्या आध्यात्मिक केंद्रात युवाशक्ती प्रतिष्ठानच्या पुढाकाराने आयोजित स्टुडंट ऑफ द इयर आणि स्टुडंट ऑफ द स्कूल अवॉर्ड या उपक्रमास विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये नसरापूर परिसरातील आठ शाळांमधील एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एकूण ४२ विद्यार्थ्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
इंग्रजी, गणित, विज्ञान, आणि सामान्यज्ञान या विषयांवर वस्तुनिष्ठ प्रश्नांधारे ही परिक्षा घेण्यात आली. शिक्षकांच्या विशेष गटाने या परिक्षांचे मूल्यांकन केले व परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच, या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांस प्रतिष्ठानतर्फे भेटवस्तूही देण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साळवडे गावचे ग्रामविकास अधिकारी अभय निकम, प्रफुल्ल द्रविड, योगेश बागमार, विद्या पवार, सुरेश माळवे उपस्थित होते. द्रविड यांनी विद्यार्थ्यांना ‘वेदिक गणित’ या विषयावर मार्गदर्शन केले. युवाशक्तीचे अध्यक्ष अजित मरळ यांनी आपल्या भाषणात प्रतिष्ठानच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. तर, भविष्यात स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अधिक व्यापक व नियोजनबद्ध उपक्रम राबविण्याची ग्वाही त्यांनी दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्पर्धात्मकता आणि शैक्षणिक प्रगतीची नवी उमेद निर्माण होत असल्याचे मत अभय निकम यांनी व्यक्त केले. या वेळी प्रतिष्ठानचे सारंग फणसे, चैतन्य इंगुळकर, रोहित पाटील व वैभव कोंडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026: पाकिस्तान स्पर्धेतून 'आऊट'? न्यूझीलंडच्या विजयाने वाढवलंय टेन्शन, पाहा कसं आहे समीफायनलसाठी समीकरण

Solapur News: चक्क.. सरकारी जागांची खरेदी-विक्री; आ. विजय देशमुखांनी विधानसभेत उठवला आवाज, साेलापूर जिल्ह्यात नेमकं काय घडलं!

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गात बदल निश्चित! सोलापूर जिल्ह्यापासून नवा मार्ग, मुख्यमंत्र्यांनी सांगितला कसा असेल बदल..

Viral Video: याला म्हणतात नशिबाची फिरकी! Window Seat बुक करूनही मिळाला धक्का; व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्रीची हिंदी मालिकेत एंट्री; दिसणार भयानक अवतारात; प्रोमो पाहून प्रेक्षक थक्क

SCROLL FOR NEXT