student beaten by his teacher at Alandi 
पुणे

वारकरी विद्यार्थ्याला गुरू महाराजांनीच केली बेदम मारहाण

विलास काटे

आळंदी : वारकरी शिक्षण घेण्यासाठी मावळातून आलेल्या अकरा वर्षांच्या वारकरी विद्यार्थ्याला गुरू महाराजांनी बेदम मारल्याने गंभीर जखमी असून खासगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आळंदी पोलिस ठाण्यात नराधम महाराज भगवान पोहणे याच्यावर गुरूवारी (ता. २०) गुन्हा दाखल असून आरोपीस परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील ओझर गावातून ताब्यात घेतल्याची माहीती आळंदी पोलिसांनी दिली. 

ही घटना आठ दिवसांपूर्वी घडल्याचे सांगितले जात असून याप्रकरणी फिर्याद कविता राजू चौधरी (वय-२८, रा.आंबी तळेगाव दाभाडे) यांनी दिली. ओम राजू चौधरी असे जखमी विद्यार्थ्याने नाव असून या मुलाला आठ दिवसांपासून दवाखान्यामध्ये उपचारासाठी मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे खासगी रूग्णालायत दाखल केले होते. त्यानंतर पिंपरीतील खासगी रूग्णायात अतिदक्षता विभागात उपचार घेत असून ओमची तब्येत गंभीर आहे. 

वडिल नसल्याने मुलाच्या घरची परिस्थीती हलाखीची आहे. आळंदीत अभ्यासाला टाकायचं म्हणून निर्णय घेतला आणि एक वर्षासून मुलगा आळंदीत आरोपी पाहुण्यांकडे माऊली ज्ञानराज प्रसाद अध्यात्मिक शिक्षण संस्थेत राहून शिकत होता. दरम्यान अचानक राजूच्या आईला फोन आला की तुमच्या मुलाला उलटी जुलाब होतात ते तुम्ही त्याला इथून घेऊन जावा. त्यामुळे ओमला घेऊन जायला त्याचा मामा रात्रीत आळंदीत आले. त्यावेळेस राजू  बेशुध्द अवस्थेत होता. त्याला आनंद हॉस्पिटल तळेगाव दाभाडे येथे उपचारासाठी दाखल केले. दोन-तीन दिवसांनी तो बोलू लागला मग त्याला विचारलं काय झालं बाळा तुला काय झाले. तर त्याने उत्तर दिलं आई मला महाराजांनी हात-पाय बांधून मारलं. अंगावर वळ दिसत होते. याबाबत आळंदी पोलिसांनी सांगितले की, राजू हा हरिपाठ व अभ्यास करत नाही म्हणून आरोपी पाहूणे याने त्याला काठीने छातीवर आणि हातापायावर मारहाण केली. यावरून राजू गंभीर जखमी आहे. आरोपी पाहूणेचा शोध घेण्यासाठी आळंदी पोलिसांचे पथक जिंतूरला ओझर या गावातून ताब्यात घेतले. रवाना झाले असून आज दिवसभरात अटक केले जाईल असे सांगितले.

दरम्यान, आळंदीत विद्यार्थ्याच्या अत्याचाराच्या घटना दिवसेदिवस वाढत चालल्याने वारकरी अध्यात्मिक शिक्षण संस्थांवर लगाम घालण्याची वेळ असल्याची चर्चा शहरात रंगू लागली.आळंदीकर आणि वारकरी याबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.तर आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र चौधर यांनी दहा हजार, जोग महारा वारकरी शिक्षण संस्थेने पाच हजार रूपयांची मदत केली असून उपचारासाठी आणखी मदतीची आवश्यकता असल्याने पोलिसांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT