Student became emotional after entering in school after 9 months in pune 
पुणे

शाळेत पाऊल टाकताच भारवली मुले; म्हणाले, आता रोज यायला आवडेल

ब्रिजमोहन पाटील

पुणे : "गेले अनेक महिने आम्ही घरात बसून शिक्षण घेत होतो, सुरक्षेची सर्व खबरदारी घेऊन आज शाळेत पाऊल ठेवले आणि एकदम भारी वाटले. शिक्षक, वर्गमित्रांना भेटून आनंद झाला, आता रोज शाळेत जायला आवडेल,'' अशा शब्दात कोंढव्यातील निकोस पब्लिक स्कूलमध्ये शिकणारी सानिया शेख तिचा अनुभव सांगत होती.

पुण्यात सुमारे सव्वा पाचशे शाळांपैकी ६६ शाळांमध्ये इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग 
सोमवार (ता.4) पासून सुरू  होणे अपेक्षित होते. पण अगदी मोजक्याच शाळा आज सुरू झाल्या. मंगळवार, बुधवार पर्यंत अनेक शाळा सुरु होण्याची शक्यता आहे.

आज सुरू झालेल्या शाळांमध्ये पुणे महापालिकेच्या शाळांसह खासगी शाळांचाही समावेश आहे. आई वडीलांनी शाळांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाय योजना केल्या आहेत याची चौकशी केली. शाळेकडून माहिती मिळाल्यानंतर सुरक्षेची खात्री पटल्यानंतरच संमतिपत्र दिले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

विश्‍वकर्मा कनिष्ठ महाविद्यालयात (इंग्रजी माध्यम) 12वीत शिकणारा सुजित म्हस्के म्हणाला, "शाळेच्या गेटवर वॉचमनने सॅनिटाझर दिले. त्यानंतर ऑक्‍सिजन लेव्हल, तापमान मोजून आत मध्ये प्रवेश दिला. वर्गात जागात सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्यात आले होते. वर्गात मास्क घालून बसावे लागले. मोजकेच विद्यार्थी असल्याने कॉलेज एकदम शांत वाटत होते.''

निकोस पब्लिक स्कूलचा विद्यार्थी प्रज्ञेश चव्हाण म्हणाला, ""शाळेने सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेतल्याने भीती वाटत नव्हती. कोरोनामुळे मास्क घालून, सोशल डिस्टन्स ठेवून खूप महिन्यांनी शाळेत गेलो, हा अनुभव खूपच वेगळा होता. मित्रांच्या जवळ जाता आले नाही, पण आम्ही सगळे एका वर्गात बसल्याने, शिक्षक समोर शिकवत असल्याचे बघून भारी वाटले.''


"आमच्या शाळेतील 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संमतिपत्र आले आहेत, पण आज पहिल्या दिवशी केवळ 12वीचा वर्ग सुरू केला आहे. पुढील दोन दिवसात इतर वर्गही सुरू केले जातील, एका वर्गात 30 विद्यार्थी बसतील, त्याचे नियोजन पूर्ण झाले आहे.''
- लभा देशमुख, प्राचार्या, विश्‍वकर्मा कनिष्ठ महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: पानिपत'कारांच्या गळ्यात मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची माळ?

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT