साताऱ्यात आज विद्यार्थी दिवस सोहळा
प्रतापसिंह हायस्कूलमध्ये समता सैनिक दलातर्फे देणार मानवंदना
सातारा, ता. ६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक प्रवास ता. सात नोव्हेंबर १९०० रोजी साताऱ्यातील इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेऊन सुरू झाला. या दिनानिमित्त डॉ. आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाच्या स्मृती जागवण्यासाठी छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे उद्या (शनिवार) विद्यार्थी दिवस सोहळा होणार आहे. यादरम्यान समता सैनिक दलाच्या वतीने हायस्कूलमध्ये मानवंदनाही दिली जाणार आहे.
डॉ. आंबेडकरांच्या या शाळा प्रवेश दिनाला १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. या सोहळ्यात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. बार्टीचे मुख्य विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड, मुख्याध्यापक सन्मती देशमाने यांच्यासह सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, समता सैनिक दलाच्या वतीने सकाळी डॉ. आंबेडकर पुतळा येथे विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांच्या हस्ते व अरुण पोळ यांच्या उपस्थितीत अभिवादन केले जाईल. त्यानंतर आंबेडकर अनुयांयाच्या समवेत समता सैनिक दल छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे दाखल होईल. तेथे ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेला मानवंदना देण्याचा कार्यक्रम होईल. या मानवदनेनंतर शाळेच्या पुढाकाराने होणाऱ्या मुख्य विद्यार्थी दिवस सोहळ्यात कार्यकर्ते व समता सैनिक दल सहभागी होईल.
...................................
एक वही, एक पेन अभियान
डॉ. आंबेडकरांनी शिका हा मूलमंत्र दिला. त्यामुळे हा मूलमंत्र व्यापक होण्यासाठी यावेळी ‘एक वही, एक पेन’ अभियान राबवण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थी दिवस सोहळ्यात सहभागी होताना प्रत्येकाने एक वही, एक पेन घेऊन येऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहनही श्री. जावळे यांनी केले आहे.
....................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.