Crime sakal
पुणे

Crime News : विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरी करणाऱ्याला वारजे पोलिसांनी केले गजाआड

महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लपवून ठेवलेल्या चावीने दरवाजा उघडून लॅपटॉप चोरणाऱ्या तरुणाला वारजे पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे ताब्यात घेतले आहे.

महादेव पवार

वारजे - महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लपवून ठेवलेल्या चावीने दरवाजा उघडून लॅपटॉप चोरणाऱ्या तरुणाला वारजे पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे ताब्यात घेतले आहे.

संशयित आरोपी अर्जुन तुकाराम झाडे (वय-22) याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून बारा लॅपटॉप, सात लॅपटॉप चार्जर, एक कॅमेरा व दोन दुचाकी वारजे पोलिसांनी जप्त केल्या आहेत. असा एकूण 6 लाख 44 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महाविद्यालयीन परिसरामध्ये तसेच हॉस्टेलमध्ये प्रवेश करून बूटात अथवा दरवाजाजवळ ठेवलेली चावी वापरून विद्यार्थ्यांच्या खोलीमध्ये हा आरोपी प्रवेश करत होता. आणि खोलीमध्ये असणारे लॅपटॉप चोरून नेत होता. अशी माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंडे व त्यांच्या पथकाने कर्वेनगर परिसरामध्ये सापळा लावला.

तसेच या भागातील त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले व गोपनीय बातमीदारामार्फत असा चोरी करणाऱ्या तरुणाची माहिती मिळाली. यावरून संशयित आरोपी म्हणून झाडे याला ताब्यात घेतले असता, त्याच्या लॅपटॉपची पाहणी करण्यात आली. तेव्हा तो उडवा-उडवीचे उत्तरे देऊ लागला. अधिक चौकशी केली असता त्याने पुणे शहरातील वारजे, कर्वेनगर, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड या परिसरातून लॅपटॉप चोरी केले असल्याचे दिसून आले.

तसेच यापूर्वी रायगड येथील महाड भागामध्ये शिक्षणासाठी असताना त्याने महाड व माणगाव येथे दोन दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली. संशयित आरोपीकडुन सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, प्रवीण पाटील, उपायुक्त सुहेल शर्मा, सहाय्यक आयुक्त भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंडे, रामेश्वर पार्वे, प्रदीप शेलार, हनुमंत मासाळ,अमोल राऊत, गोविंद फड, विक्रम खिलारी, विजय भुरुख, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, अजय कामठे, अमोल सुतकर, राहुल हंडाळ, नंदकुमार चव्हाण यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT