student of Mahatma Phule Secondary School Gold medal in karate hdapsar sakal
पुणे

पुणे : पालिका शाळेतील विद्यार्थिनीने कराटेत मिळवले सुवर्णपदक

महानगरपालिकेच्या येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा दयानंद चौधरी हिने अमृतसर (पंजाब) येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले

कृष्णकांत कोबल

हडपसर : महानगरपालिकेच्या येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा दयानंद चौधरी हिने अमृतसर (पंजाब) येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. भारत सरकारच्या नीती आयोग अंतर्गत युथ इंडिया स्पोर्ट डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने "ऑल इंडिया नॅशनल कराटे कॅम्पयनशिप सन २०२२' ही स्पर्धा आयोजित कली होती.देशातील तेरा राज्यातील तेरा संघातून सुमारे २००० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. चौदा ते सोळा वयोगटातील स्पर्धेत कु. प्रतिक्षाने सुवर्ण पदक पटकावले आहे. ती संदीप नाना तुपे स्पोर्ट क्लबमधून कराटे प्रशिक्षण घेत आहे.

या स्पर्धेत मिळवलेल्या यशामुळे प्रतिक्षाचे कौतुक होत आहे. पुढे संधी मिळाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे तीचे स्वप्न आहे. प्रतिकूल परिस्थितीतही ध्येयवादी मानसिकता ठेवून काही करण्याचे ठरविले तर मार्ग निघत जातो. प्रामाणिकपणे केलेला सराव, सरावासाठी मिळालेले मार्गदर्शन, शाळा व आईवडिलांकडून मिळालेले प्रोत्साहन यामुळे हे यश प्राप्त झाले असल्याची भावना प्रतिक्षाने व्यक्त केली. शाळाप्रमुख संजय भोईटे, वर्गशिक्षिका दीपाली ठोंबरे, शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी प्रतिक्षाचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Yojana: आता भारताचा भाषिक वारसा संरक्षित होणार! नव्या योजनेची घोषणा, 'ज्ञान भारतम' योजना म्हणजे नेमकी काय?

Video: हेच खरंखुरं स्वातंत्र्य! पुणे महागनर पालिकेच्या सुरक्षेची कमान तृतीयपंथीयांच्या हाती

Latest Marathi News Live Updates : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठीतून खास शुभेच्छा,पाहा एकापेक्षा एक सुंदर मॅसेज

Independence Day: ...म्हणून देश एकसंध राहिला, नाहीतर...; इतिहास सांगत काँग्रेस नेते मोदींना नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT