SSC HSC Board exam  
पुणे

Maharashtra Board Exam 2022 : विद्यार्थ्यांबरोबर पालकांचीही ‘परीक्षा’

बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत संभ्रम कायम

सकाळ डिजिटल टीम

पुणे: ‘‘कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या एक वर्षापासून विद्यार्थी घरात बसून अभ्यास करत आहेत. साहजिकच आई म्हणून त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावे लागत आहे. आता राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आणि सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. या निर्णयामुळे ‘त्यांची परीक्षा होणार नाही, मग आमची होणार!’ असे प्रश्न मुलगा विचारू लागलायं. त्याला परीक्षेचे महत्त्व, केलेल्या अभ्यासाचे मूल्यमापन होणे का गरजेचे आहे, हे समजवावे लागतयं’’, असा अनुभव सांगत गृहिणी असलेल्या सुनैना थोरात यांनी बोर्डाच्या परीक्षेबाबत चिंता व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. त्यापाठोपाठ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द आणि बारावीच्या परीक्षाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे बुधवारी स्पष्ट केले. यानंतर मात्र दहावी-बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा गोंधळ आणखीच वाढला. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा रद्द आणि राज्य मंडळाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या, या निर्णयामुळे पुढील शैक्षणिक वर्षात अकरावी, पदविका अभ्यासक्रम, आयटीआय अशा विविध प्रवेश प्रक्रिया कोणत्या आधारावर राबविल्या जातील. तर बारावीबाबत सीबीएसईचा निर्णय अजूनही होणार असला तरी, आभियांत्रिकी, वैद्यकीय त्याशिवाय विविध पदवी, पदविका अशा अभ्यासक्रमाची गुणवत्तेवर आधारित होणारी प्रवेश प्रक्रिया कशी होणार?, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात उपस्थित होत आहेत.

थोरात म्हणाल्या, ‘‘दहावी-बारावीच्या परीक्षा होणे महत्त्वाचे आहे. बोर्डाच्या परीक्षेचे महत्त्व आम्ही जाणतो. परंतु एकीकडे परीक्षाला पाठवायचे, तर कोरोनाचा संसर्ग झाला तर याचे टेन्शन सतत राहणार, तर दुसरीकडे परीक्षा नाही झाली, तर मुलांचा अभ्यास, ते किती शिकले हे कळणार कसे, असा प्रश्न उपस्थित होतो. सध्या सगळेच पालक आणि विद्यार्थी द्विधा मनःस्थितीत आहेत.’’

''बोर्डाच्या परीक्षेची ८० टक्के तयारी झाली आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय योग्य आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत परीक्षा रद्द करू नये. कारण त्यातूनच आपला किती अभ्यास झाला आहे, हे कळणार आहे. त्यामुळे परीक्षा घेणे किंवा अन्य काटेकोर पद्धतीने मूल्यमापन होणे गरजेचे आहे. दहावी-बारावी हा पुढील शिक्षणाचा पाया आहे, तो भक्कम होणे आवश्यक आहे.’’

- ज्ञानेश्वर नागरगोजे, विद्यार्थी, बारावी, विज्ञान शाखा

''बोर्डाच्या परीक्षा घ्यायला हव्यात. तसेच वर्षभर विद्यार्थी ऑनलाइनद्वारे शिक्षण घेत आहेत. त्यातून त्यांना किती कळाले, हे देखील समजणे गरजेचे आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेवर मुलांचे पुढील शिक्षण अवलंबून आहे. परंतु सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, तर राज्य मंडळाने त्या पुढे ढकलल्या. अशात दहावीनंतर अकरावीचे प्रवेश कसे होणार, हे पाहायला हवे. बोर्डाने तसेच सरकारने याचा विचार करून निर्णय घ्यावा.''

- नरेश गोफणे, पालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bernard Julien Passes Away : वर्ल्ड कप विजेत्या अष्टपैलू खेळाडूचे निधन; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डोक्याचा वाढवलेला ताप

पूरग्रस्त भागाचा दौऱ्यावेळी भाजप खासदार-आमदारावर हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू

Diwali 2025 Home Makeover: दिवाळीपूर्वी घराला रंग देताय? मग वास्तूनुसार 'या' शुभ रंगांची करा निवड

Latest Marathi News Live Update : अपघातावेळी गौतमी पाटील वाहनात नव्हती, पुणे पोलिसांच्या तपासातून अंतिम माहिती

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT