savitiribai phule pune university sakal
पुणे

Pune University : विद्यार्थ्यांची ससेहोलपट थांबणार! घरबसल्या मिळणार विद्यापीठाची प्रमाणपत्रे

पुणे विद्यापीठाने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत आगामी काळात विद्यापीठात कागदविरहित (पेपरलेस) प्रक्रिया राबविण्याचे ठरविले आहे.

सम्राट कदम

पुणे - दुय्यम गुणपत्रिकेपासून ते पदवी प्रमाणपत्रापर्यंत, विविध अर्जांसाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या चकरा माराव्या लागतात. नाशिक आणि नगरच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन अर्जानंतर कागदपत्रे जमा करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गाठावे लागते.

प्रवासाचा मनस्ताप तर असतो, पण त्याहीपेक्षा माहितीचा अभाव आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे विद्यार्थी अक्षरशः मेटाकुटीला येतात. आता कागदविरहित सुविधा केंद्रामुळे विद्यार्थ्यांची यातून सुटका होणार आहे.

विद्यापीठाने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत आगामी काळात विद्यापीठात कागदविरहित (पेपरलेस) प्रक्रिया राबविण्याचे ठरविले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज भरून आवश्यक ते कागदपत्र मिळणार आहेत. तसेच अर्ज जमा करण्यासाठी विद्यापीठात यावे लागणार नाही. विद्यापीठाशी संलग्न नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांना याचा थेट फायदा होणार आहे.

परीक्षेतील सुधारणांसाठी स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशींच्या आधारे नुकतेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाने हा निर्णय घेतला आहे. अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना अर्ज केल्यानंतर लवकरात लवकर ट्रान्सक्रिफ्ट प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

विद्यार्थ्यांची गैरसोय दूर -

विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे दिली जातात. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करून, त्याची मुद्रित प्रत आवश्यक कागदपत्रांसह विद्यापीठात सादर करावी लागते. यासाठी नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थी प्रवासाचा खर्च करून येतात. बऱ्याचदा अपुऱ्या माहितीचा त्यांना फटका बसतो. या सर्व प्रक्रियेला लागणारा वेळ आणि मनस्ताप पाहता विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय व्हायची. आता ती दूर होईल, अशी अपेक्षा आहे.

हे लक्षात ठेवा...

- पहिल्या टप्प्यात ट्रान्सक्रिप्टसाठी आणि नंतर दुय्यम गुणपत्रक, पदवी प्रमाणपत्र आदींसाठी सुविधा उपलब्ध होईल. २०१० नंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच याचा लाभ मिळेल.

- विद्यार्थ्यांने त्यांच्या स्टुडंट प्रोफाइल सिस्टिममध्ये ई-मेल आणि मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे गरजेचे.

- कागदपत्रांच्या ऑनलाइन पडताळणी नंतरच २४ ते ७२ तासात प्रमाणपत्र प्रोफाईलमध्ये मिळेल. हार्डकॉपी विद्यापीठात किंवा दिलेल्या पत्त्यावर मिळेल.

अर्जाचे ट्रॅकींग करण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध केली जाईल. पहिल्या टप्प्यात अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि आर्किटेक्ट या अभ्यासक्रमांसाठी २४ तासांत आणि इतरांसाठी ७२ तासात ऑनलाइन प्रमाणपत्र उपलब्ध होईल. भविष्यात डिजीलॉकरमध्येही ही प्रमाणपत्रे उपलब्ध होतील.

- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

परीक्षा सुधार समितीच्या शिफारशी विचारात घेऊन विद्यापीठाकडून आवश्यक उपाय योजना करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्र प्राप्त करता येतील. तसेच विद्यार्थ्यांच्या वेळची आणि पैशाची बचत होणार आहे.

- राहुल पाखरे, सदस्य, अधिसभा आणि परीक्षा सुधार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

Viral Video : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकताच, शिवम दुबे ट्रेनने तातडीने मुंबईसाठी रवाना का झाला? भारतीय खेळाडूने सांगितलं कारण...

IPL 2026 : इशान किशन कर्णधार, अभिषेक शर्माकडे उप कर्णधारपद... संघात खांदेपालट... आणखी एक अचंबित करणारा निर्णय

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

मुंबईत टँकरमाफियांचा हैदोस, अडीच हजाराच्या टँकरची १० हजारांना विक्री; पालिकेत विरोधक आक्रमक

SCROLL FOR NEXT