पुणे

काशीळ अतीत केंद्राचा बालआनंद मेळावा उत्साहात

CD

विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी
जिंकली उपस्थितांची मने

अतीत केंद्राचा बालआनंद मेळावा उत्साहात

काशीळ, ता. १२ : अतीत केंद्रातील १२ शाळांमधील विद्यार्थ्यांचा बालआनंद मेळावा उत्साहात झाला. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांनी तयार केलेली चित्रे, कागदापासून बनवलेल्या वस्तू, विविध शैक्षणिक प्रकल्प आणि कलाकुसरीचे नमुने यांचे प्रदर्शनही या वेळी भरवण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकता, सर्जनशीलतेला वाव मिळाला. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे, पंचायत समिती सदस्या सुषमा जाधव, मानसिंग मोरे, स्वाभिमानी महिला संघटनेच्या अध्यक्षा समताताई घोरपडे, राजेंद्र घोरपडे, भाजपचे सरचिटणीस गणेश जाधव, रूपाली मोहिते आदी उपस्थित होते.
मेळाव्यात केंद्रप्रमुख सुनीता शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे नियोजन केले होते. केंद्रसंचालक उमेश निकम, प्रतिभा जाधव, तसेच शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. सैनिक स्कूल निवड परीक्षा, यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा, क्रीडा स्पर्धा यातील यशस्वितांसह शिक्षकांचा सत्कार झाला. यात अतित केंद्रातून शिवाजी जाधव, पंकज जाधव, उमेश निकम, तब्बसुम डांगे या शिक्षकांचा सत्कार केला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत अतीत केंद्रशाळा तालुकास्तर प्रथम क्रमांक मिळवल्याबद्द‌‌ल मुख्याध्यापक भानुदास शेडगे, शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. पंकज जाधव व सारिका डांगे यांनी सूत्रसंचालन केले. सतीश जाधव यांनी आभार मानले.

B01666
अतीत : मेळाव्यात बाेलताना समता घोरपडे. त्या वेळी राजेंद्र घोरपडे, मानसिंग मोरे, अजित साळुंखे, सुषमा जाधव, रूपाली मोहिते आदी.
......................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT