murder sakal
पुणे

Khadakwasala Crime : विद्यार्थ्याचा झोपेतच कोयत्याने वार करून खून

खानापूरजवळ आनंदवन सोसायटीतील घटना

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला - मणेरवाडी, घेरा सिंहगड परिसरातील आनंदवन सोसायटीमध्ये १५ वर्षीय विद्यार्थ्यावर झोपेतच कोयत्याने वार करून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

प्रकाश हरीसिंग राजपूत असे मृत‌ विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो खानापूर येथील विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिकत होता. त्याची आई सोसायटीच्या परिसरात कामगार आहे. येथील कामगारांच्या खोलीमध्ये तो आई आणि भावासमवेत राहत होता. दररोज दुपारी शाळेतून आल्यावर तो जेवून झोपत असे.

आज‌ही‌ तो शाळेतून आल्यावर झोपला होता. तो झोपेत असतानाच त्याच्यावर कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला. शेजाऱ्यांनी पोलिसांना हा प्रकार कळविला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Singer Nisar Vaynad : उदित नारायण यांची ‘कार्बन कॉपी’! प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ४४व्या वर्षी निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

Mohan Bhagwat: ब्रिटनमधील हिंदूंची ब्रिटन हीच कर्मभूमी: मोहन भागवत; कर्मभूमीशी प्रतारणा करण्यास हिंदुत्व सांगत नाही

Baba Amte Anandwan: बाबा आमटेंचे ‘आनंद निकेतन’ हस्तांतराच्या वाटेवर, पुनर्बांधणीचा खर्च पेलवेना, आनंदवनातील कॉलेज अडचणीत

Motivational Story: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या; रमाबाईंच्या जिद्दीची सरन्यायाधीशांनी घेतली दखल, संघर्षाची प्रेरणादायी कहाणी..

तुम्हाला मूल्यमापन करण्याची गरज आहे का?

SCROLL FOR NEXT