वैदू वस्ती, पिंपळे गुरव - शाळेची पाहणी दौरा करताना सभापती मनीषा पवार. 
पुणे

अरेरे! चक्क ‘स्मार्ट’ शाळेतील विद्यार्थी अनवाणी

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शिक्षण समितीच्या शाळा पाहणी दौऱ्यात पिंपळे सौदागर, वैदुवस्ती आणि पिंपळे गुरव या शाळांमधील विद्यार्थी अनवाणी असल्याचे आढळले. अनेकांना बूट-मोजे मिळाले नाहीत. निवडलेल्या ‘स्मार्ट’ शाळांमधील स्वच्छतागृहात दुर्गंधी आढळली. तसेच विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार लॅबची रचना केली नसल्याचेही समोर आले. 

सभापती मनीषा पवार यांनी सोमवारपासून (ता. १८) शाळा पाहणी दौरा सुरू केला. प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, सहाय्यक प्रशासन अधिकारी पराग मुंढे, समितीच्या सदस्या निर्मला गायकवाड, रेखा दर्शिले, मीनल यादव, पर्यवेक्षक रवींद्र शिंदे उपस्थित होते. पाहणी केलेल्या पिंपळे सौदागर शाळेची स्मार्ट शाळा म्हणून निवड केली आहे. पहिली ते चौथीपर्यंतची मुले या शाळेत शिकतात. त्यांना संगणक लॅब दिली असून ती पाचवी ते बारावीच्या मुलांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत नाही. व्हरांड्यात लावलेले फलक उंचावर असल्याने त्यांना मान वर करून पाहावे लागते.

स्मार्टसंदर्भात साहित्य देताना विद्यार्थी वयोगटाचा विचार होणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी नमूद केले. वैदुवस्तीमध्ये मुलांना पिण्यास पाणी नाही. पाण्याचा उपसा करण्यासाठी मोटारीची गरज असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर! आता 'या' सेलिब्रिटींवरही कारवाई होणार, एफडीएचं मोठं पाऊल; नेमकं प्रकरण काय?

Kolhapur Bribery Case : बदलीसाठी शिक्षकाकडून २५ हजार घेताना शिक्षण अधिकारीला टपरीवर अटक, कोल्हापुरात लाचलुचपतची मोठी कारवाई

बाबो...! प्रग्नेंसीनंतरही कतरिनाचे केस इतके लांब अन् घनदाट कसे? 'हे' आहे तिच्या केसांचं सिक्रेट

Sanjay Raut Statement : तर मी भाजपात जाईन, संजय राऊतांच्या वक्तव्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या

Latest Marathi News Live Update : काश्मीरमध्ये पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ

SCROLL FOR NEXT