nimgoan mhalung 
पुणे

शाळेच्या भिंतींना ऐकायचाय चिमुकल्यांचा किलबिलाट

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे (पुणे) :  शाळा केव्हा सुरु होईल हे सांगता येत नसले, तरी शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्या डिजिटल रंगकाम करून आकर्षक व बोलक्या केल्या आहेत. या भिंती आता विद्यार्थ्यांच्या प्रतिक्षेत आहेत. 

निमगाव म्हाळुंगी येथील प्राथमिक शाळा चौथीपर्यंत असून, सध्या येथे १५२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर, सहा शिक्षक कार्यरत आहेत. येथील शाळेची जुनी कौलारू व धोकादायक इमारत पाडून तेथे सुसज्ज व सर्व सुविधांयुक्त आकर्षक इमारत बांधली आहे. त्यातील ५ वर्ग खोल्या रांजणगावातील फियाट कंपनीने बांधून दिल्या असून, ३ खोल्या सर्व शिक्षा अभियानातून बांधल्या आहेत. शाळेच्या भौतिक सुविधांसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांची जिद्द व खंबीर आर्थिक साथ मिळाल्याची माहिती मुख्याध्यापक मारुती निकम यांनी दिली. 

शाळा स्थापनेला नुकतीच १०० वर्ष पूर्ण होऊन, शतकोत्तर वाटचाल चालू झाली आहे. सध्या कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद असली, तरी शासनाच्या पर्यायी शैक्षणिक धोरणानुसार सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत. विद्यार्थी घरी बसून अभ्यास करीत आहेत. शाळा केव्हा सुरु होईल हे सांगता येत नसले, तरी येथील शिक्षकांच्या संकल्पनेतून वर्ग खोल्यांच्या भिती डिजिटल रंगकाम करून सर्व भिंती आकर्षक व बोलक्या केल्या असून, या भिंती सध्या विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. सर्व बोलक्या भिंती लोकवर्गणीतून निर्माण केल्या आहेत. या भिंतीवर विविध वर्गाचा अभ्यासक्रम व इतर ठळक माहिती लिहिण्यात आली आहे. या सजलेल्या भिंती विद्यार्थ्यांना खुणावत आहेत.  

या शाळेत पिण्याचे पाणी, प्रशस्त क्रीडांगण, विविध खेळाचे साहित्य, ओपन जिम, सुसज्ज ग्रंथालय, प्रोजेक्टर, ई- लर्निंग संच, गार्डन आदी सुविधा सध्या उपलब्ध आहेत. आगामी काळात ग्रामपंचायत निधीतून सौरऊर्जा प्रकल्प व मध्यान्ह भोजन कक्ष उभारण्यात येणार असल्याचे शिक्षक अविनाश चव्हाण यांनी सांगितले. 

कोरोनाचे संकट लवकर दूर होऊन बालकांचा कलकलाट शाळेत पुन्हा सुरु होईल, त्यामुळे शाळेच्या सौंदर्यात आणखी भर पडून, आकर्षक रंगरंगोटी केलेल्या भिंती खऱ्या अर्थाने बोलक्या होतील, अशी अपेक्षा येथील कृतिशील मुख्याध्यापक मारुती निकम यांनी व्यक्त केली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT